MNS निघाली लोकसभा निवडणूक लढायला, पण उमेदवारांचाच पत्ता नाही!

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मनसेला लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांचा शोध घेण्यापासून सुरुवात करावी लागत आहे.

226
MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण
MNS : लोकशाहीची हत्या तेव्हाही झाली होती, मनसेने करून दिली आठवण

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) मनसेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मनसेला (MNS) लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांचा शोध घेण्यापासून सुरुवात करावी लागत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात मनसेकडे (MNS) दक्षिण मुंबईतून मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात असली तरी प्रत्यक्षाचा चार लोकसभा मतदार संघांमध्ये मनसेची अवस्था उमेदवारांचा शोध घेण्यापसून सुरु झाली असल्याचे पहायला मिळत आहे. (MNS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Navnirman Sena) स्थापना सन २००६मध्ये झाल्यानंतर पक्षाच्यावतीने प्रथमच म्हणजे सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) एकही उमेदवार उभा केला नाही. त्याआधी सन २००९ आणि सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले होते. सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी अधिक मते घेतल्याने काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) फायदा झाला होता. परंतु पुढे सन २०१४मध्ये मोदी लाटेचा फायदा शिवसेनेला (Shiv Sena) झाला आणि त्यात मनसेची ताकद कमी झाली. त्यामुळे शिवसेना भाजप (BJP) युतीचे खासदार निवडून आले. याच मोदी लाटेचा फायदा सन २०१९मध्ये युतीच्या उमेदवारांना होणार असल्याने मनसेने या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले नव्हते. याचा फटका मनसेला सन २०१९च्या विधानसभेत बसला. संपूर्ण राज्यात एकमेव राजू पाटील वगळता मनसेचा आमदार निवडून येवू शकला नाही. त्यातच सन २०१७च्या निवडणुकीत मनसेचे (MNS) जे मुंबईत सात नगरसेवक निवडून आले होते, त्यातील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा एक आमदार आणि मुंबईत एक नगरसेवक अशीच ओळख निर्माण झाली होती. शिवसेनेचे नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचा उल्लेखही संपलेल्या पक्षाचे नेते असा केला होता. (MNS)

(हेही वाचा – Congress : महाराष्ट्रात कॉंग्रेसने २५ जागा लढवाव्या; राज्यांतील नेत्यांनी हायकमांडपुढे मांडली भूमिका)

…यांच्याशिवाय मनसेकडे एकही उमेदवार दृष्टीक्षेपात नाही

त्यामुळे पक्षाची पुन्हा एकद पकड मजबूत करून मतदारांना आपल्याकडे वळण्यासाठी मनसेने (MNS) पुन्हा सर्व लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली. परंतु दरम्यानच्या काळात मनसेची पक्षावरील संघटनात्मक पकडच ढिली झालेली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांना उतरवण्याचा निर्णय घेतला असला तरी बाळा नांदगावकर आणि शालिनी ठाकरे यांच्याशिवाय मनसेकडे (MNS) एकही उमेदवार दृष्टीक्षेपात नाही. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यापूर्वी श्वेता परुळेकर आणि आदित्य शिरोडकर यांना निवडणुकीत उतरवले असले तरी या मतदार संघातील जातीचे समिकरण पहाता त्याप्रकारचा उमेदवारच सध्या मनसेकडे नाही. त्यामुळे मनसेला दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबईत एकही उमेदवार नसून उत्तर मुंबईत नयन कदम याला उतरवण्याचा प्रयत्न झाला तरी प्रत्येक लोकसभा मतदार संघात मनसेला उमेदवाराचा शोधच घ्यावा लागत आहे. (MNS)

मनसेकडे असलेले प्रमुख नेते पक्ष सोडून गेल्याने तसेच काहींनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने मनसेकडे सध्या उमेदवारांची मोठी वानवा आहे. मनसेला सध्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागत असून लोकसभा सोडा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत उभे करण्यासाठीही उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. सध्या तरी पक्षात उमेदवारांचाच शोध सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेसोबत मनसेच्या युतीचीही चर्चा सुरु झाली असून युती झाल्यास दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील एक मतदार सोडायचे झाल्यास उत्तर पश्चिम मतदार संघ सोडावा लागेल. तसे झाल्यास किर्तीकर यांचा पत्ता कापावा लागेल, असेही बोलले जात आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.