Fire : पुणे-बंगळुरू महामार्गावर टँकरला भीषण आग

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

135
Fire : पुणे-बंगळुरू महामार्गावर टँकरला भीषण आग
Fire : पुणे-बंगळुरू महामार्गावर टँकरला भीषण आग

पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पुणे-बंगळुरू महामार्गावर एका टँकरला काल रात्री भीषण आग (Fire) लागली आहे. ताथवडे येथे काही वेळापूर्वी ही घटना घडली. टँकरमध्ये नेमके काय आहे अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र एकामागोमाग होणाऱ्या स्फोटाचा झाल्याने ताथवडे महामार्ग परिसरात परिसरात दहशत पसरलेली आहे.

ताथवडे परिसरातील जेएसपीएम महाविद्यालया जवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार-पाच महाविद्यालयाच्या बसेसदेखील पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचलेले आहेत. टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे विभाग शर्तीचे प्रयत्न करीत आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून सुदैवाने अजून तरी कोणतीही जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही.

(हेही वाचा – Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये विराटच ‘किंग’; सचिनलाही मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम)

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात तीन ते चार ब्लास्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ताथवडे परिसरातील जेएसपीए (JSPM) विद्यालयाजवळ अचानक तीन ते चार स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.