Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये विराटच ‘किंग’; सचिनलाही मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम

84
Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये विराटच 'किंग'; सचिनलाही मागे टाकत रचला 'हा' विक्रम

रविवार ८ ऑक्टोबर रोजी भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना जिंकून विश्वचषकाचा विजयी श्रीगणेशा केला आहे. या सामन्यात रोहित शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच तंबूत परतल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि के. एल. राहुल (K. L. Rahul) यांनी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देत भारताला (World Cup 2023) विजय मिळवून दिला. ३०० चेंडूत २०० धावा करण्याचे आव्हान भारताने ४१ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केले, मात्र विजयी षटकार मारणाऱ्या के. एल. राहुल याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले.

अशातच किंग कोहली म्हणजेच विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम केले आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकत एक नवा विक्रम केला आहे.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा

वन-डे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे. विराट कोहलीच्या नावावर जवळपास १,१०० धावांची नोंद झाली आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावावर २,२७८ धावा तर सौरव गांगुली १,००६ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू

कोहलीने (Virat Kohli) विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. कोहलीने आतापर्यंत विश्वचषकाच्या २७ डावांमध्ये १५ झेल घेतले आहेत. २०११ ते २०२३ यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील २७ सामन्यात विराट कोहलीने १५ झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने १८ सामन्यात १४ झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला ४४ सामन्यात फक्त १२ झेल घेता आलेत.

सचिनचाही विक्रम मोडला

आयसीसीच्या व्हॉइट बॉल स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने २४ डावात २,७२० पेक्षा जास्त धावा करत सचिनचा विक्रम देखील मोडला आहे. सचिन तेंडुलकरने ५८ डावात २,७१९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने ६४ डावात २,४२२ धावा केल्या आहेत.

(हेही वाचा – World Cup 2023 : भारताची गोड सुरुवात; कांगारुंना धक्का देत ‘कोहली-राहुल’चा धमाका)

किंग कोहलीची विराट कामगिरी

केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची दीडशतकी भागिदारी झाली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागिदारी आहे.

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर जमा झाल्या आहेत. २७० डावात विराट कोहलीचा ११४ वा ५० प्लस स्कोर ठरला आहे.

विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर ११ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ११ हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू आहे.

विराट कोहली (Virat Kohli) विश्वचषकात सर्वाधिक धावा (नॉन ओपनर) करणारा फलंदाज ठरला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.