Talathi Recruitment : तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध होणार

67
Talathi Recruitment : तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध होणार
Talathi Recruitment : तलाठी भरती परीक्षेच्या उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध होणार

राज्यातील साडेचार हजार पदांसाठी तलाठी भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. (Talathi Recruitment) मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या केंद्रांवर लाखो उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. आता त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका पहाण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाइन लॉग इनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणारी कंपनी टीसीएसकडे नोंदविता येणार आहे. (Talathi Recruitment)

(हेही वाचा – Congress : काँग्रेसची आजची अवस्था दर्शवते हे बॅनर..)

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका हरकतीला १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास १०० रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली. (Talathi Recruitment)

उत्तरपत्रिकेची प्रक्रिया पार पाडल्यानंतर तलाठी भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. निकाल लागल्यानंतर कोणत्याही तक्रारी किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत घेण्यात आली. जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीप्रमाणे, तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. याबबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (Talathi Recruitment)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.