Congress : काँग्रेसची आजची अवस्था दर्शवते हे बॅनर..

दादर पश्चिम कबुतर खाना जवळ मुंबई काँग्रेस पक्षाच्या वतीने गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे

69
Congress : काँग्रेसची आजची अवस्था दर्शवते हे बॅनर..
Congress : काँग्रेसची आजची अवस्था दर्शवते हे बॅनर..
विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस (Congress) पक्ष खिळखिळा झाला असून आज त्याला आधाराची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच प्रादेशिक पक्षांचा आधार घेत पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु असला तरी एक सांधा जोडला की दुसरा निखळून पडतोय,अशीच काहीशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे. काँग्रेस पक्षाची ही अवस्था आता दादरच्या कबुतर खान्या जवळ लावलेल्या पक्षाच्या बॅनरच्या माध्यमातुनहीं प्रतिबिंबित होत आहे.
दादर पश्चिम कबुतर खाना जवळ मुंबई काँग्रेस (Congress) पक्षाच्या वतीने गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे. डॉ. यद्येश्वर विठ्ठल पुरंदरे चौक येथे मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी लावलेला बॅनर हा तुटून पडला आहे, शिवाय यावर कबुतरांनी घाण करून ठेवली आहे. त्यामुळे हे बॅनर एक प्रकारे काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीचे दर्शन घडवत आहे.

(हेही वाचा-NIA Raid : खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ५ राज्यांमध्ये एनआयएचे छापे)

काँग्रेसची अवस्था घर का ना घाट का अशी झालेली आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांनी केली होती. तर एक वर्षापूर्वी सामना मध्ये अग्रलेखातून काँग्रेसवर टीका झाली होती, त्यात त्यांनी असे म्हटले होते की, काँग्रेस (Congress) पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? त्यामुळे पक्षाचे नेते राहुल हे भारत जोडो आंदोलनाच्या माध्यमातून तसेच सर्व प्रादेशिक पक्षांचा आधार घेत आय.एन.डी.आय.ए.च्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करत असेल तरी या पक्षाची सद्यस्थिती ही या तुटलेल्या बॅनर पेक्षा वेगळी नाही हे आता जनतेलाही कळू लागले आहे आणि हे बॅनर काँग्रेसचे खरे दर्शवत आहे, असे बोलले जात आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=8pL6Pvam8q4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.