शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवणा-या शाळांवर कठोर कारवाई करा! शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

85

लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणेही कठीण झाले आहे. शाळेच्या फीबाबत असलेल्या शाळांच्या कठोर धोरणामुळे आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाला मुकावं लागतं की काय, अशी चिंता पालकांना लागली आहे. पण याचबाबतीत आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवणा-या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. हे चांगले असले तरी शाळांच्या फीमध्ये कुठलीही कपात करण्यात येत नाही, त्यामुळे शाळांकडून सहकार्य मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. शाळेतून काढून टाकण्यात येत असल्याच्या वारंवार येणा-या तक्रारींची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी कठार पावले उचलत, प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण हा मूलभूत अधिकार असून शिक्षण संस्था व व्यवस्थापक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कुठल्याही कारणास्तव वंचित ठेऊ शकत नाहीत, असे सांगितले आहे.

(हेही वाचाः 10वीचा निकाल 15 जुलैपर्यंत, पण 11वीत प्रवेश कसा घ्यायचा? वाचा…)

कठोर कारवाईचे निर्देश

ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारणे, शाळेतून काढून टाकणे, निकाल रोखून ठेवणे, परीक्षेला बसू न देणे अशाप्रकारच्या तक्रारी आल्यास असं बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांना दिले असल्याचे वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.