Swiss Watches Cheaper? भारतासाठी स्वीस घड्याळं, चॉकलेट होणार स्वस्त

स्वीत्झर्लंडहून आयात होणारी घड्याळं आणि चॉकलेटवर आयात शुल्कात सूट मिळणार आहे. 

108
Swiss Watches Cheaper? भारतासाठी स्वीस घड्याळं, चॉकलेट होणार स्वस्त
  • ऋजुता लुकतुके

जगप्रसिद्ध स्वीस घड्याळं आणि चॉकलेट यांच्यासाठी भारतीयांना आता कमी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. दोन देशांमध्ये अलीकडे व्यापारविषयक करार झाला आहे. आणि त्यानुसार, केंद्र सरकार स्वीत्झर्लंडमधून भारतात येणारी घड्याळं आणि चॉकलेट्स यावर आयात शुल्कात सवलत देणार आहे. पुढील सात वर्षांत ही सवलत टप्प्या टप्प्याने कमी होणार आहे. आणि सातव्या वर्षी ती चक्क शून्यावर येईल. (Swiss Watches Cheaper?)

सध्या हे आयात शुल्क २० ते ३० टक्के इतकं आहे. हा विशेष व्यापारी करार फक्त स्वीत्झर्लंडच नाही तर आईसलँड, लिस्टेनस्टाईन आणि नॉर्वे या देशांबरोबरही भारताने अशाच प्रकारे करार केला आहे. २०२२-२३ साली या चार देशांबरोबर भारताने १८.६६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता. यात स्वीत्झर्लंडबरोबर सगळ्यात जास्त व्यापार झाला. तर त्या खालोखाल नॉर्वेबरोबर भारताने देवाण घेवाण केली आहे. (Swiss Watches Cheaper?)

(हेही वाचा – Defective Medicines : देशभरात आठ हजारांहून अधिक औषधांचे नमुने निकृष्ट; काय सांगतो केंद्र सरकारचा अहवाल)

या उत्पादनांना सवलतीपासून ठेवण्यात आले दूर 

भारताकडून या ४ देशांना प्रामुख्याने मौल्यवान खडे, रासायनिक पदार्थ, औषधांसाठी वापरली जाणारी मूलद्रव्य आणि दागिने या गोष्टी निर्यात होतात. तर भारत या देशांकडून स्वीस घड्याळं, रसायनं, सोनं, बोटी, छोट्या बोटी या गोष्टी आयात करतो. स्वीत्झर्लंडहून येणाऱ्या वाईनवरही सवलत देण्याचा भारताचा विचार आहे. (Swiss Watches Cheaper?)

‘सोन्यावरील आयात शुल्क तसंच ठेवलं आहे. बाकी वैद्यकीय उपकरणं, औषधं, आणि प्रक्रिया केलेलं अन्न या बाबतीत उत्पादनानुसार, शुल्क माफी लागू होईल. डेअरी उत्पादनं, कोळसा, कृषि उत्पादनं यांना सवलतीपासून दूर ठेवण्यात आलं आहे,’ असं केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारताने एकूण १५० उत्पादनांसाठी आयात शुल्कातील सवलत या ४ देशांना देऊ केली आहे. यातील ११४ उत्पादनं स्वीत्झर्लंडहून आयात होतात. तर नॉर्वेकडून आपण १०७ उत्पादनं आयात करतो. लिश्टेनस्टाईनकडून ११० उत्पादनं भारतात आयात होतात. (Swiss Watches Cheaper?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.