Honey Trap : पाकिस्तानी गुप्तचरांना संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या डॉकयार्डमधील कर्मचाऱ्याला अटक

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कल्पेशने पैशाच्या बदल्या सोशल मीडियावर मैत्री झालेल्या महिलेकडे महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.

402

माझगाव डॉकयार्ड येथून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर कल्पेश बायकर याला अटक केली आहे. कल्पेश हा संरक्षण विषयक संवेदनशील माहिती त्यांना पुरवायचा (Honey Trap). त्यामुळे त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात आणि त्याच्याशी संपर्कात असलेल्यांच्या विरोधात गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही झालेली अटक 

कल्पेश हा अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर एका महिलेशी चॅटिंग करत होता (Honey Trap) आणि त्यांचे संभाषण इथपर्यंत पोहोचले की, त्याने तिच्या आदेशाचे पालन करण्यास सुरुवात केली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कल्पेशने पैशाच्या बदल्या सोशल मीडियावर मैत्री झालेल्या महिलेकडे महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.

(हेही वाचा Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य अजूनही थांबता थांबेना…)

महिलेशी बोलणारा आरोपी कल्पेश हा पीआयओच्या महिला एजंटला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकून संवेदनशील माहिती देत होता. त्याच्या फेसबुक प्रोफाइलनुसार कल्पेश बायकर हा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये फॅब्रिकेटर म्हणून नोकरीला होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील असलेल्या बायकरने अलिबाग येथील आयटीआय महाविद्यालयात फिटरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई नाही. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या २३ वर्षीय गौरव पाटील याला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या एजंटसोबत गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी अटक केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.