राज्यसभेत Sudha Murthy यांनी पहिल्याच भाषणात केल्या ‘या’ दोन मागण्या

आई मरण पावते तेव्हा रुग्णालयासाठी तो एक केवळ मृत्यू असतो; पण कुटुंबासाठी आई कायमची गमावली जाते, असेही Sudha Murthy यांनी सांगितले.

126
राज्यसभेत Sudha Murthy यांनी पहिल्याच भाषणात केल्या 'या' दोन मागण्या
राज्यसभेत Sudha Murthy यांनी पहिल्याच भाषणात केल्या 'या' दोन मागण्या

प्रसिद्ध लेखिका आणि खासदार सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांनी पहिल्यांदाच २ जुलै रोजी राज्यसभेत (Rajya Sabha) भाषण केले आहे. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी केलेल्या मागण्यांमुळे त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. सुधा मूर्ती यांनी या भाषणात महिलांसंबंधित समस्या आणि पर्यटनाबाबत त्यांचे मत सभागृहासमोर मांडले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर त्या बोलत होत्या. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आणि यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सासू आहेत.

(हेही वाचा – Ambadas Danve Suspension: दानवे यांची शिवीगाळ; ठाकरेंची माफी… तरी ट्रोल का झाले?)

गर्भशयाच्या कर्करोगापासून प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण करा

सुधा मूर्ती यांनी सुरुवातीला महिलांच्या आरोग्यसंबंधी विषय मांडला. गेल्या काही वर्षात महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांच्या मृत्यूदरातही वाढ झाली आहे. महिलांना या गर्भशयाच्या कर्करोगापासून प्रतिबंधित करायचे असेल, तर पाश्चात्य देशात एक लस तयार झाली आहे. एक लसीकरण आहे, जे नऊ ते १४ वयोगटातील मुलींना दिले जाते, ज्याला गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण म्हणून ओळखले जाते . जर मुलींनी ते घेतले, तर गर्भाशयाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. आई मरण पावते तेव्हा रुग्णालयासाठी तो एक केवळ मृत्यू असतो; पण कुटुंबासाठी आई कायमची गमावली जाते, असेही त्यांनी सांगितले.

“सरकारने कोविड दरम्यान एक मोठी लसीकरण मोहीम हाताळली आहे. त्यामुळे ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण करणे फार कठीण नाही”, असेही सुधा मूर्ती यांनी सांगितले. “गर्भाशय ग्रीवाचे लसीकरण पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित केले गेले आहे आणि ते गेल्या २० वर्षांपासून वापरले जात आहे. हे लसीकरण फार महाग नाही. आज माझ्यासारख्या क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी ते १४०० रुपये आहे. जर सरकारने हस्तक्षेप केला आणि वाटाघाटी केली तर ही लस ७००-८०० वर येऊ शकते. परंतु, भविष्यात याचा मुलींना नक्कीच चांगला फायदा होईल”, असेही त्या म्हणाल्या.

भारतातील जागतिक वारसा स्थळ वाढवण्याची मागणी

सुधा मूर्ती यांनी देशांतर्गत वारसा स्थळ (World Heritage Site) वाढवण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “भारतात ५७ देशांतर्गत पर्यटनस्थळे आहेत. ज्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून विचार केला पाहिजे. यामध्ये कर्नाटकातील श्रवणबेला गोला येथील बाहुबली मूर्ती, लिंगराजाचे मंदिर, त्रिपुरातील उनाकोटी खडकावरील कोरीव काम, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, मितावली येथील चौसठ योगिनी मंदिर, गुजरातमधील लोथल, गोल गुंबड इत्यादींचा समावेश आहे. भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. परंतु ५७ स्थळांनाही हा दर्जा दिला जाऊ शकतो. आपण त्या ५७ स्थळांची काळजी घेतली पाहिजे. श्रीरंगममधील मंदिरे अप्रतिम आहेत. २५०० वर्षे जुने असलेले सारनाथच्या जुन्या स्मारकांचा समूह अजूनही जागतिक वारसा स्थळांमध्ये नाहीत. मध्य प्रदेशातील मितावली येथील हजारो वर्षे जुन्या चौसठ योगिनी मंदिरातून जुन्या संसद भवनाच्या डिझाइनचे प्रोटोटाइपिंग करण्यात आले आहे.” (Sudha Murthy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.