Ambadas Danve Suspension: दानवे यांची शिवीगाळ; ठाकरेंची माफी… तरी ट्रोल का झाले?

153
Ambadas Danve Suspension: दानवे यांची शिवीगाळ; ठाकरेंची माफी... तरी ट्रोल का झाले?
Ambadas Danve Suspension: दानवे यांची शिवीगाळ; ठाकरेंची माफी... तरी ट्रोल का झाले?

राज्यातील पावसाळी अधिवेशनात (monsoon session) विधान परिषदेतील (legislative council) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve Suspension) यांनी सोमवारी १ जुलैला भर सभागृहात ‘म-भ’च्या भाषेत भाजपा आमदारांना शिवीगाळ केली. यावरून मंगळवारी २ जुलैला दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. दानवे यांच्या व्यक्तव्याबद्दल त्यांचा पक्ष, उबाठा (UBT), प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर माफी मागितली, मात्र ती मनमोकळ्या मनाने मागितली नसल्याबद्दल नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. (Ambadas Danve Suspension)

(हेही वाचा- Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरीतील मृतकांचा आकडा १२१ वर; भोलेबाबाचे नाव एफआयआरमधून वगळले)

काय म्हणाले उद्धव ठाकरे

“अंबादास दानवे यांच्या वर्तनाने, जर माता भगिनींचा अपमान झाला असेल, तर मी माफी मागतो. पण सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता-भगिनींचा जो अपमान केला, बहिण-भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर ते माफी मागणार का?” असे उद्धव ठाकरे यांचे निवेदन आणि त्यांचा फोटो दानवे यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर पोस्ट केला. (Ambadas Danve Suspension)

दानवे यांच्या या पोस्टवर आलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:

  • माफी मागायची तर मनमोकळे करून माग याणी काय बोलले त्याणी काय बोलले ते नंतर आवाज उठवावा.
  • अजून या मुर्खाला शंका आहे जर झाला असेल तर अस म्हणतोय.अरे नालायका त्यावेळी एक महीला पीठासीन अधिकारी होती.ही गुंडगिरीच ऱ्हासाला नेणार.
  • लाज वाटते का तुला सभागृहात शिवीगाळ करतो. सर्व सभागृहाचा गरीमा तुझया सारखया तडीपार ने बरबाद केली. कीती खालची पातळी गाठतो बघ पहीले . यांचे त्याचे धुणे धुतो स्वःतच धुण धुव . लायकी नसली तरी विरोधी पक्ष नेते पद मिळाले का असे होते
  • लायकी नसताना सभागृहात पाठवल्याचे परिणाम. अर्थात तुझा साहेबही तसाच
  • मा उद्धवजी मुनगंटीवार शेण खातील तर तुम्ही पण खाल का ?? भर सभागृहात एक महिला पीठासीन असतांना असली भाषा ?? आपण कोण आहोत ? कुठे बोलतो आहोत ? महाराष्ट्राचे प्रतिबिंब असलेल्या सभागृहात च हा हाल असेल तर ,बिहार आणि आपल्यात फरक तो काय ??फक्त नावापुरते पुरोगामीत्व
  • लाज वाटू दे तू भर सभागृहात शिवीगाळ करतोय, बाळासाहेबांनी हे धंदे शिकवले होते का? आणि वारसा सांगताय. अक्कल नाही काडीची या शेण किड्यांना
  • विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना त्या वास्तूत बसलेला माणूस तिथे उपस्थित असलेल्या महिला वर्गाचा जराही विचार न करता इतकी अर्वाच्य भाषेत गरळ ओकतो. आणि त्याबद्दलची माफी मागताना पण उद्धव ठाकरेंना आधार लागतो तो भाजपाचा. आणि निर्लज्जपणाचा कहर म्हणजे यांचे समर्थक बोलतात छान केलं अंबादास दानवेंनी. या समर्थकांना आई बहिणी वरून शिव्या देणं म्हणजेच मर्दानगी वाटते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.