-
कल्याण, प्रतिनिधी
Stunt Bikers in Kalyan कल्याणच्या गांधरीचा रिंग रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. सायंकाळच्या सुमारास स्टंटबाज भरधाव वेगाने या रोडवरून गाड्या चालवतात, तर कधी रेसिंग लावतात. त्यामुळे या रस्त्यावर इव्हिनिंग आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रोडवर अनेकदा अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे. पोलिस या रोडवरील स्टंटबाजांना धडा शिकवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करतात. मात्र त्यानंतरही जीवघेणा थरार आजही सुरूच आहे. (Stunt Bikers in Kalyan)
कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई करणार का? असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (Stunt Bikers in Kalyan)
काही दिवसांपूर्वी याच रिंग रोडवर सायकलिंग करताना कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका अल्पवयीन कार चालकाने पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात गंभीरित्या जखमी झालेले श्रीनिवास यांच्या जागीच मृत्यू झाला. या रोडवर सातत्याने अल्पवयीन तरूण दुचाक्या किंवा चारचाकी गाड्या घेऊन येतात, रेसिंग लावतात, स्टंट करतात. या स्टंटमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत. (Stunt Bikers in Kalyan)
पोलिसांच्या कारवायांकडे भयभीत नजरा
कल्याणमधील नामांकित व्यवसायिकाच्या मृत्यूनंतर खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अल्पवयीन कार चालकासह त्याच्या आईच्या विरोधात कारवाई केली आहे. रिंग रोडवर डायरी गेटिंग देखील करण्यात आली आहे. ठिकठिकाणी ब्रेकर देखील तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही दुचाकीस्वार तरूणांचा स्टंट काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या स्टंटबाजांवर पोलिस काय कारवाई करणार याकडे भयभीत नजरा लागल्या आहेत. (Stunt Bikers in Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

