Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष मोहीम

ही विशेष कारवाई वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांविरुद्ध मोहिमेचा एक भाग असल्याची माहिती वाहतुक विभागाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

98
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष मोहीम
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहतुक पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई शहरात वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी कर्कश आवाज करणारे ५८४ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून वायू प्रदूषण करणाऱ्या तसेच पीयूसी संपलेल्या २९४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Air Pollution)

ही कारवाई वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांविरुद्ध मोहिमेचा एक भाग असल्याची माहिती वाहतुक विभागाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या कारवाईचा उद्देश आहे. मुंबई वाहतूक पोलीसही शहरातील रस्ते सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त राहावेत यासाठी प्रयत्नशील आहेत असे अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai Air Pollution)

मुंबईतील ४१ वाहतुक विभागाकडून जानेवारी २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मॉडीफाईड केलेले एकूण ५८४ वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, तसेच पीयूसी संपलेले आणि वायू प्रदूषण करणाऱ्या २०९४६ वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कलम ११५ (७), १७७अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच फेरबदल केलेल्या २०५१ मोटार सायकलींवर ई-चलान कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Air Pollution)

(हेही वाचा – Sassoon Dock Port : ससून डॉक बंदराचे नुतनीकरण; महापालिकेच्यावतीने नवीन जलवाहिनी टाकणार)

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम राबवून मॉडीफाईड केलेले एकूण २४४ सायलेन्सर जप्त करण्यात आले असून, पीयूसी अंतर्गत ५८६६ वाहनांवर मोटार वाहन अधिनियम कलम १९४ (फ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ५१७ मॉडीफाईड सायलेंसरवर मोटार वाहन अधिनियम कलम १९८ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून अवैधरित्या फेरबदल केलेल्या १२७ मोटार सायकलवर ई-चलान अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.