Sassoon Dock Port : ससून डॉक बंदराचे नुतनीकरण; महापालिकेच्यावतीने नवीन जलवाहिनी टाकणार

कुलाब्यातील ससून गोदी मासेमारी बंदराच्या अर्थात ससून डॉकमधील जेटीचे नुतनीकरण करण्यात येत असून या नुतनीकरणाअंतर्गत महापालिकेच्यावतीने जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

99
Sassoon Dock Port : ससून डॉक बंदराचे नुतनीकरण; महापालिकेच्यावतीने नवीन जलवाहिनी टाकणार
Sassoon Dock Port : ससून डॉक बंदराचे नुतनीकरण; महापालिकेच्यावतीने नवीन जलवाहिनी टाकणार

कुलाब्यातील ससून गोदी मासेमारी बंदराच्या अर्थात ससून डॉकमधील जेटीचे नुतनीकरण करण्यात येत असून या नुतनीकरणाअंतर्गत महापालिकेच्यावतीने जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या जलवाहिनी टाकण्यासह इतर कामांसाठी महाराष्ट्र मस्त्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाला अदा करण्यात आले आहे. (Sassoon Dock Port)

ससून डॉक हे सर्वात मोठे होलसेल मासळी विक्रीचे केंद्र असून हे डॉक मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारित येत आहे. या ससून डॉकचे नुतनीकरण करताना या भागातील पाणी पुरवठा सेवेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग ते ससून गोदी मासेमारी बंदर गेट पर्यंत रामभाऊ साळगावकर व शहीद भगतसिंह मार्गावरून ४५० मि मी व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार असून यासाठी महापालिकेला महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ यांच्याकडून २ कोटी ३८ लाख ०१ हजार रुपये महापालिकेत जमा केली आहे. तर उर्वरीत ठेवी रक्कम ७३ लाख ४३ हजार ८५९ रुपये अशाप्रकारे ३ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम महापालिकेत ठेवीच्या स्वरुपात जमा आहे. तसेच प्रत्यक्ष कामाच्या वेळी खर्चात वाढ झाल्यास वाढीव रक्कम महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ यांच्याकडून घेतली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Sassoon Dock Port)

(हेही वाचा – Milk Tanker Fire : पुणे-नाशिक महामार्गावर दुधाच्या टँकरला भीषण आग; तरुणांनी दुधानेच विझवली आग)

या भागात जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी मेसर्स मानश कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Sassoon Dock Port)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.