South Central Mumbai : दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसची लॉबिंग : उबाठा शिवसेना हा मतदार संघ सोडणार का?

उबाठा शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम या तीन मतदार संघांसोबतच ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघावरही दावा ठोकला आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आणि उत्तर मुंबईतून घोसाळकर कुटुंबातील विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर यांची नावे चर्चेत आहे.

231
South Central Mumbai : दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसची लॉबिंग : उबाठा शिवसेना हा मतदार संघ सोडणार का?

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाची (South Central Mumbai) जागा शिवसेना उबाठा पक्षाला जाणार असल्याचे ठामपणे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या वाट्याला जाणाऱ्या जागेवरही या शिवसेनेने दावा ठोकायला सुरुवात केला. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या जागेवरही जागा काँग्रेसने दावा ठोकण्यास सुरुवात केली असून यामध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ काँग्रेसला सोडला जावा आणि याठिकाणी मुंबई अध्यक्षा प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी निवडणूक लढावी अशाप्रकारची मागणी काँग्रेस पक्षाकडून जोर धरू लागली आहे. (South Central Mumbai)

दक्षिण मध्य मुंबईतून (South Central Mumbai) शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना टक्कर देण्यासाठी उबाठा शिवसेनेने पक्षाचे सचिव अनिल देसाई यांना प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी मतदारसंघ बांधणीच्या कामाला जुंपले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघ हा इंडी आघाडी तथा महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेला जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र, आतापर्यंत उबाठा शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम या तीन मतदार संघांसोबतच ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघावरही दावा ठोकला आहे. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील आणि उत्तर मुंबईतून घोसाळकर कुटुंबातील विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर यांची नावे चर्चेत आहे. (South Central Mumbai)

(हेही वाचा – Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर…)

हे तीन विधानसभा मतदार संघ काँग्रेससाठी पुरक

त्यामुळे मुंबईतील मतदार संघांपैकी पाच मतदार संघांमध्ये उबाठा शिवसेनेने दावेदारी ठोकल्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि एकेकाळी मुंबईतून पाच खासदार निवडून येणाऱ्या काँग्रेस पक्षाला आता उबाठा शिवसेनेकडून कमी जागा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेने आपल्याकडे घ्यावेत आणि त्याबदल्यात दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ (South Central Mumbai) सोडावा अशी सूचना काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असून धारावी आणि चेंबूर, अणुशक्ती नगर तसेच वडाळा हे तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी पुरक आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी मुंबईतील हा लोकसभा मतदारसंघ हा उबाठा शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेससाठी पुरक असल्याने उबाठा शिवसेनेची मदत मिळाल्यास काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. (South Central Mumbai)

या मतदार संघासाठी आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास धारावी आणि चेंबूरमधून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे पुन्हा सक्रीय झाल्याने या मतदार संघातील काँग्रेसची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मतदारसंघ अनुकूल असून यापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोन वेळा खासदार राहिले होते. त्यामुळे याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेवर आता काँग्रेसकडून दबाव टाकला जात असून प्रत्यक्षात हा मतदारसंघ सोडला जातो का उत्तर मध्य मुंबई या एकाच मतदार संघावर काँग्रेस समाधान करून घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (South Central Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.