काहीजण राजकीय स्वार्थासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असे म्हणतात; Ashish Shelar यांनी ठाकरेंना लगावला टोला

110
समारंभात पुरस्कार वितरणाचे दृश्य
काहीजण राजकीय स्वार्थासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' असे म्हणतात; Ashish Shelar यांनी ठाकरेंना लगावला टोला

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “एक भारत श्रेष्ठ भारत” असा नारा देत आहेत, एक देश एक कर, एक देश एक रेशनकार्ड, एक देश एक इलेक्शन यादृष्टीने वाटचाल करीत आहेत. तेव्हा काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” असे म्हणत असून हा त्यांचा नारा देशासाठी घातक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केले. (Ashish Shelar)

यावेळी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, हे वर्षे ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जन्मशताब्दी वर्षे असून माऊलींनी त्यावेळी विश्वकल्याणाचा विचार मांडला. आम्ही त्याच विचाराने काम करीत असून माय होम इंडिया ही संस्था याच विचाराने काम करणाऱ्यांना सन्मानित करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मांडली असून आपण सगळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणारे आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

माय होम इंडिया या संस्थेच्या वतीने दिला जाणारा पंधरावा “वन इंडिया अवॉर्ड २०२५” यावर्षी त्रिपुरा राज्यामध्ये जनजाती भागात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते मदन हरी मलसम यांना शनिवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. (Ashish Shelar)

(हेही वाचा – Trump Administration :  ग्रीन कार्डधारकांनो, सावधान! विदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि निर्गमन नियमात बदल)

तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आपल्या भाषणात म्हणाले की, ईशान्य भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे. कला, लोककला, खाद्य संस्कृती, वाद्य अशा विविधतेने हा प्रदेश नटलेला असून आता या प्रदेशात विकासाची गंगा वेगाने वाहू लागली आहे. विमान सेवा, रेल, रस्ते अशा सर्व कनेक्टिव्हिटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केल्या असून इतके वर्षे विकासापासून दूर राहिलेला हा प्रदेश आता विकासाच्या “महामार्गावर गतिमान” झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आपल्या भाषणात पूर्वी पूर्वांचल, नागालँड, अरुणाचल, आसाम ही ईशान्यकडील राज्ये पूर्णतः दुर्लक्षित होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर आता गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारने पाच लाख कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवा सुविधांसाठी उपलब्ध करून दिला असून रेल्वे विमान अशा सर्व सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ईशान्य भारतात गेल्या दहा वर्षात ५ लाख कोटी पायाभूत सेवा सुविधांसाठी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. (Ashish Shelar)

आजही तिथल्या सर्व समस्या सुटल्या असे नाही, पण राष्ट्रवादाच्या भावनेने आता हा संपूर्ण प्रदेश जोडला गेला आहे. आपणही आपल्या मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांमध्ये या भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवायला हवा. आपण बंधू भावाने, त्यांच्याशी वागून सलोखा, मैत्री जोपासायला हवी, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.  (Ashish Shelar)

(हेही वाचा – Kalyan City : प्रबोधनकार ठाकरे सरोवरात नौका विहार सुरू; लेझर शो, म्युझिकल फाऊंटनला उत्स्फूर्त प्रतिसाद)

या पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून ईशान्य भारतात सामाजिक, सांस्कृतिक, खेळ आणि शैक्षणिक विषयात लक्षणीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमाची संकल्पना माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांची असून देवेंद्र आतकरी हे संयोजक म्हणून काम पाहत आहेत. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.