वाढत्या लठ्ठपणामुळे ‘या’ नव्या आजाराची भीती

104
वाढत्या लठ्ठपणामुळे 'या' नव्या आजाराची भीती
वाढत्या लठ्ठपणामुळे 'या' नव्या आजाराची भीती

बैठ्या जीवनशैलीमुळे व्यायामापासून दुरापास्त होणाऱ्या लठ्ठ माणसांमध्ये स्लिप अप्निया वाढत असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. झोपेत श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे, श्वास बंद पडत असल्याची जाणीव निर्माण होणे आदी स्लिप अप्निया या आजाराची लक्षणे आहेत. मुंबईल्या तरुण वयोगटांमध्ये ही लक्षणे आढळून येत असल्याचे बेरीएट्रीक सर्जन सांगतात.

लठ्ठपणावर मात करण्यासाठी बेरीएट्रीक सर्जन यांच्याकडे रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. औषधोपचारानेही रुग्णाची अनियंत्रित वजनवाढ कमी होते. मात्र, वजन फारच असल्यास कित्येकदा डॉक्टर रुग्णाची बेरीएट्रीक सर्जरी करतात. मात्र लठ्ठ रुग्णांमध्ये स्लिप अप्निया दिसून येत असल्याचे प्रमाण आता वाढले आहे. रुग्णालयात दाखल होताच कित्येकदा रुग्णांना तातडीने प्राणवायू द्यावा लागतो.

(हेही वाचा – अजितदादांच्या गटात जयंत पाटील? लवकरच मंत्रिपदाची घेणार शपथ)

स्लिप अप्निया टाळण्यासाठी –

० वजनावर नियंत्रण असावे.
० मद्यपान करू नका.
० पुरेशी झोप घ्या.
० प्राणायम करा.
० श्वसन प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी योग करा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.