Period Tracker on Whatsapp: आता व्हॉट्सअपवर कळणार मासिक पाळीची तारीख

109

सध्या व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे खूप फायदे होतात. मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर आता महिलांसाठी उपयोगी सुविधा मिळणार आहे. महिलांना आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून मासिक पाळीची तारीख समजणार आहे. सिरोना या आरोग्यविषयक ब्रँडने भारतातील पहिले Period Tracker लॉन्च केले आहे. त्यामुळे महिलांना पिरेडची तारीख समजणे सोपे जाणार आहे.

हे पिरेड ट्रॅकिंग टूल महिलांना तीन गोष्टींसाठी उपयुक्त असणार आहे. मासिक पाळीची तारीख समजणे,गर्भधारणा आणि त्यासंबंधीची माहिती महिलांना या ट्रॅकिंग टूलद्वारे मिळू शकते. Sirona या बिझनेस अकाऊंटद्वारे महिलांना ही माहिती मिळू शकते.

असे करता येईल ट्रॅकिंग

  • 9718866644 या सिरोना बिझनेस अकाऊंटवर Hi मेसेज सेंड करावा लागेल
  • त्यानंतर चॅट बॉक्समध्ये Track My Periods
  • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर महिलांना पिरेड्स ट्रॅकिंग आणि गर्भधारणेशी संबंधित माहिती विचारण्यात येईल.
  • या माहितीच्या आधारे महिलांना आपले पिरेड्स ट्रॅक करता येणार आहेत.
  • तसेच ओव्ह्युलेशन डिटेल्स,पिरेडची पुढची आणि आधीची तारीख, तसेच पिरेड सायकलची माहिती या ट्रॅकरद्वारे मिळू शकते.

(हेही वाचा: …तर तुमचे पॅन कार्ड होणार रद्द, केंद्र सरकारचा निर्णय)

महिलांसाठी उपयुक्त

अनेकदा महिलांना आपल्या पिरेड्सची तारीख लक्षात राहत नाही. त्यामुळे अनेकदा महिला आपल्यासोबत पॅड्स ठेवत नाही. त्यामुळे अचानक पिरेड्स आल्यामुळे महिलांची फार मोठी अडचण होते. पण आता महिलांना आपले पिरेड्स ट्रॅक करणे शक्य झाल्यामुळे महिलांना अलर्ट राहता येणार आहे. तंत्रज्ञानामुळे मासिक पाळीविषयी माहिती मिळाल्यामुळे महिलांना त्याचा फार मोठा फायदा होईल, असे सिरोना हायजीन प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ दीप बजाज यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.