Sikh Prayer In US Parliament : शीख प्रार्थनेचा अमेरिकेच्या संसदेनेही केला सन्मान; वाचा काय घडले…

इतिहासात प्रथमच अमेरिकेत न्यू जर्सी येथील एका शीख ग्रंथीने प्रतिनिधीगृहाचे कामकाज सुरू करण्यात आले. न्यू जर्सी येथील पाइन हिल गुरुद्वाराचे ग्रंथी ग्यानी जसविंदर सिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी सभागृहात प्रार्थना करून दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली.

103
Sikh Prayer In US Parliament : शीख प्रार्थनेचा अमेरिकेच्या संसदेनेही केला सन्मान; वाचा काय घडले...
Sikh Prayer In US Parliament : शीख प्रार्थनेचा अमेरिकेच्या संसदेनेही केला सन्मान; वाचा काय घडले...

अमेरिकेत न्यू जर्सी येथील एका शीख ग्रंथीने प्रतिनिधीगृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी प्रार्थना केली, जी इतिहासात प्रथमच घडली आहे. (Sikh Prayer In US Parliament) न्यू जर्सी येथील पाइन हिल गुरुद्वाराचे ग्रंथी ग्यानी जसविंदर सिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी सभागृहात प्रार्थना करून दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली. या वेळी सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांनी घोषणा केली की, सिंग कार्यवाही सुरू करतील. प्रार्थनेनंतर लगेचच काँग्रेस सदस्य डोनाल्ड नॉरक्रॉस यांनी हा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे म्हटले. सिंग हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये (संसदेचे कनिष्ठ सभागृह) प्रार्थना करणारे पहिले शीख ग्रंथी आहेत.

(हेही वाचा – Western Railway : डब्बे झाले इंजिन पासून वेगळे, प्रवाशांचा गोंधळ)

आज दक्षिण जर्सीला अभिमान वाटला

या वेळी नॉरक्रॉस म्हणाले, ”आज घडलेला इतिहास हा एक स्मरणपत्र आहे की, अमेरिका धर्माच्या मुक्त अभिव्यक्तीचे स्वागत करते आणि त्याचा आदर करते. त्यासाठी नेहमीच वचनबद्ध राहील. ग्यानी सिंग यांचा आज साऊथ जर्सीला अभिमान वाटला. या क्षणी त्यांच्यासोबत सहभागी असणे, हा आमचा सन्मान आहे.” (Sikh Prayer In US Parliament)

शीख समुदायासाठी आनंदाचा प्रसंग

शीख कोऑर्डिनेशन कमिटी ईस्ट कोस्टचे मीडिया प्रवक्ते हरजिंदर सिंग म्हणाले, ”आज आम्ही येथे एका अतिशय ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. यूएस काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच शीख प्रार्थनेने सभागृहाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली. ग्यानी जसविंदर सिंग यांनी प्रार्थना केली. त्यामुळे शीख समुदायासाठी, संपूर्ण जागतिक शीख समुदायासाठी हा खूप आनंदाचा प्रसंग आहे.” (Sikh Prayer In US Parliament)

हरजिंदर सिंग म्हणाले, ”आम्ही या काँग्रेसच्या सदस्यांसाठी प्रार्थना केली. जे स्वतंत्र जग आणि इथल्या सर्व अमेरिकनांचे रक्षण करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही एक वंश म्हणून संपूर्ण मानवतेसाठी इच्छा आणि प्रार्थना करतो. हा शीख धर्माचा सार्वत्रिक संदेश आहे.” (Sikh Prayer In US Parliament)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.