Western Railway : डब्बे झाले इंजिन पासून वेगळे, प्रवाशांचा गोंधळ

वैतरणा स्थानकावरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

67
Western Railway : डब्बे झाले इंजिन पासून वेगळे, प्रवाशांचा गोंधळ
Western Railway : डब्बे झाले इंजिन पासून वेगळे, प्रवाशांचा गोंधळ

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) वैतरणा स्थानकावरील (Vaitarna Station) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद (Ahemdabad) पॅसेंजर रेल्वेचा अपघात थोडक्यात टळला आहे. ही रेल्वे वैतरणा स्थानकावरुन गाडी सुटताना अचानक गाडीचे इंजिन (Railway Engine) रेल्वेच्या डब्ब्यांपासून वेगळे झाले. अशी घटना शनिवारी (३० सप्टेंबर) रोजी यामुळे स्थानकावरील प्रवाशांनी एकच गोंधळ सुरु केला. दरम्यान यामुळे पश्चिम रेल्वेचा (Western Railway)) निष्काळजीपणा अनेकवेळा समोर येत असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने अहमदाबाद पॅसेंजर ही रेल्वे रवाना झाली होती. नेहमीप्रमाणे रेल्वे शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकावर थांबा घेतला. थांबा घेतल्यानंतर ही रेल्वे पुढच्या प्रवासाला रवाना झाली. पंरतु तेवढ्यातच या रेल्वेचं इंजिन रेल्वेच्या डब्ब्यांपासून वेगळं झालं. ही बाब स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात आली आणि स्थानकावर एकच गोंधळ सुरु झाला. हे इंजिन जोडण्यासाठी किमान अर्धा तासाचा कालावधी लागला. दरम्यान ही बाब लक्षात येताच वैतरणा स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि पॅसेंजरच्या लोको पायलट यांनी हे इंजिन रेल्वेच्या डब्यांना पुन्हा जोडले.

(हेही वाचा : 2000 Rupees Note Exchange : अजुन मिळणार आठवडाभराचा कालावधी)

त्यानंतर ही रेल्वे पुन्हा पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. त्यानंतर सुटकेचा निश्वास पण अद्यापही यामागचं कारणं समोर आलेलं नाही. तर यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या रेल्वेच्या लोको पायलट आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे इंजिन पुन्हा रेल्वेला जोडले. यामुळे मोठा अपघात अगदी थोडक्यासाठी टळला. तर कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणताही जीवितहानी झाली नाही. तसेच कोणत्याही प्रकारची दुखापत देखील झाली नाही. पंरतु जर गाडी वेगात असतान हा प्रकार घडला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.