Mumbai Water : मुंबईकरांसाठी पाण्याचा फुल स्टॉक : वर्षभराची तहान भागणार

76
Mumbai Water : मुंबईकरांसाठी पाण्याचा फुल स्टॉक : वर्षभराची तहान भागणार
Mumbai Water : मुंबईकरांसाठी पाण्याचा फुल स्टॉक : वर्षभराची तहान भागणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पाण्याची पातळी आता पूर्ण क्षमतेने वाढली असून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत तब्बल १४.४७ लाख दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत १४.३६ लाख दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवणारा पाण्याचा फुल स्टॉक तयार झाला आहे. त्यामुळे पुढील ३७३ दिवस पुरेल इतका पाणी यासर्व धरणांमध्ये जमा झाला असून मुंबईकरांना यंदा कपातीविना पाणी पुरवठा होणार आहे. (Mumbai Water)

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा ३० सप्टेंबर २०२३ रोजी तब्बल सुमारे ९९.२३ टक्के म्हणजे १४ लाख ३६ हजार १८३ दशलक्ष लिटर एवढा पाणी जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठीच्या आवश्यक पाणी साठ्याच्या तुलनेत ११ हजार १८० दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा कमी झाला आहे. म्हणजे शुन्य पूर्णांक ६७ टक्के एवढा पाणी साठा कमी आहे. तर याच तारखेला म्हणजे ३० सप्टेंबर रोजी २०२२ आणि २०२१ रोजी अनुक्रमे ९८.५६ टक्के व ९८. ७७ टक्के एवढा पाणी साठा होता होता. मागील अनेक महिन्यांपासून यावर्षीचा पाणी साठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी होता. परंतु ३० सप्टेंबर २०२३ रोजी या पाण्याचा साठा मागील दोन वर्षांच्या पुढेही जमा झाला आहे. (Mumbai Water)

अप्पर वैतरणा धरणातील (Upper Vaitrana Dam) एकूण पाणी साठा ९९.६८ टक्के तर भातसा धरणातील पाणी साठा ९९. २७ टक्के एवढा पाणी साठा  (water storage) जमा झाला आहे. त्यामुळे आधीच सर्व धरणे भरून वाहत असताना भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणे ही काठोकाठ भरल्याने मुंबईचे टेन्शन कमी झाले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत किती पाऊस पडून पाणी साठा वाढतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईतील वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन हे ३० सप्टेंबर २०२३ रोजी जमा होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आधारीत जलअभियंता विभागाच्या (Department of Water Engineering) माध्यमातून केले जाते. त्यामुळे दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे सध्या जमा झालेल्या एकूण पाणी पुरवठ्याच्या आधारे पुढील ३७३ दिवस पुरेल इतका पाणी साठा सर्व धरणांमध्ये जमा झाल्याने पुढील वर्षभर पुरेल इतका पाणी झाल्याने जलअभियंता विभागाच्या (Department of Water Engineering) वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. (Mumbai Water)

(हेही वाचा – 2000 Rupees Note Exchange : अजुन मिळणार आठवडाभराचा कालावधी)

३० सप्टेंबर पर्यंतचा मागील तीन वर्षांतील एकूण पाणी साठा

२०२३ : १४ लाख ३६ हजार १८३ दशलक्ष लिटर्स (९९.२३ टक्के)

२०२२ : १४ लाख २६ हजार ५०९ दशलक्ष लिटर्स (९८.५६ टक्के)

२०२१ : १४ लाख २९ हजार ५४३ दशलक्ष लिटर्स (९८. ७७ टक्के)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.