Temple : देशभरातील साडेचार लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढा उभारावा – सुनील घनवट

66

अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी होत असली, तरी अद्याप काशी, मथुरा येथील मंदिरे (Temple) इस्लामी आक्रमणापासून मुक्त झालेली नाहीत. यांसह देशभरात ४ लाख ५० हजार मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. चर्च, मशिदी यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण कशासाठी? हिंदूंनी (Hindu) या विरोधात व्यापक लढा उभारायला हवा, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट म्हणाले.

जीएसबी टेम्पल ट्रस्ट, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात ‘मंदिर-संस्कृती रक्षा सभा’चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर गौंड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळे, मुंबई येथील प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ. अमित थडानी, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे उपस्थित होते.

यावेळी नास्तिकतावाद्यांच्या हत्यांचे भरकटलेले अन्वेषण आणि यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांना फसवण्याचे षड्यंत्र याविषयीचे सत्य उघड करणार्‍या डॉ. अमित थडानी लिखित ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी पुस्तकाच्या ‘दाभोलकर, पानसरे हत्या : तपासातील रहस्ये?’ या मराठी भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मंदिरे (Temple) ही सनातन धर्माची प्रचारकेंद्रे आहेत, हे हिंदूंनी (Hindu) समजून घ्यावे. मंदिरांतील पावित्र्याचा लाभ व्हावा, यासाठी मंदिरांमध्ये तोकडे कपडे परिधान करून येणार्‍यांचे विश्वस्तांनी प्रबोधन करावे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करावी, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट म्हणाले.

(हेही वाचा Hindu :…तर मुसलमान १९२१ प्रमाणे पुन्हा हिंदूंवर अत्याचार करतील; रणजित सावरकर यांनी केले सतर्क )

तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचा अहवाल सरकार दाबून टाकते – वकील वीरेंद्र इचलकरंजीकर

महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक सरकारीकरण झालेल्या मंदिरातील घोटाळे हिंदू विधीज्ञ परिषदेकडून उघड करण्यात आले आहेत. कोल्हापूर येथील ३ हजारांहून अधिक मंदिरांचा (Temple) समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी चालू आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचा अहवाल सरकार दाबून टाकत आहे. या विरोधात आमचा लढा चालू आहे. त्यामुळे मंदिराच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढायचे असेल, तर हा लढा सरकारच्या भ्रष्ट मानसिकतेच्या विरोधातील लढा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, असे हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.

सरकार राबवत असलेली बहुतांश महामंडळे तोट्यात आहेत. अनेक उपक्रमांमध्ये सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातीलच शासकीय खात्यांमधल्या एका वर्षात चोर्‍यांमुळे ८ हजार कोटी रुपये इतकी हानी होते, तर सार्वजनिक उपक्रमांमध्ये १०० रुपये गुंतवते, तर त्यातील ५ पैसे सरकारला मिळतात आणि त्यावर ७ रुपयांहून अधिक व्याज द्यावे लागते. अशी सरकारे कोणत्या तोंडाने मंदिर व्यवस्थापन चांगले करू, अशी खात्री देतात?, असा सवाल वकील वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.