पवई व तुळशी तलावाचा जीव वाचवा, गाळ काढण्याचा कृती आराखडा सादर करा; मंत्री Ashish Shelar यांचे निर्देश

189
UNESCO प्रमाणित १२ किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
  • प्रतिनिधी

मुंबईतील पवई, तुळशी आणि विहार तलावांतील वाढत्या गाळामुळे निर्माण झालेला गंभीर पर्यावरणीय प्रश्न लक्षात घेऊन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आता निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या तलावांतील गाळ काढण्यासाठी तीन महिन्यांत कृती आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

मंत्रालयात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील, तसेच पर्यावरण विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पवई तलावाच्या जलधारेला जुलैच्या आधीच भरपूर पाणी येण्याचे कारण गाळ न काढल्यामुळे तर नाही ना? या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली.

(हेही वाचा – Ind vs Eng, Headingley Test : ‘मालिकेचा निकाल काहीही लागला तरी बुमराह ३ कसोटीच खेळणार’; गंभीर याचे विधान)

सांडपाणी, जलपर्णी आणि प्रदूषणाचे संकट

पवई तलाव ५५७ एकर क्षेत्रफळावर असून, परिसरातील सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्यामुळे जलपर्णीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर लक्ष केंद्रित करत शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले की, “सांडपाण्याचा प्रवाह त्वरित रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आक्रमक कारवाई करावी. जलपर्णीच्या नियंत्रणासाठी ठोस यंत्रणा उभी करावी.”

गाळ वाहतूक, साठवणूक आणि निधी योजनेचा अभ्यास करा

गाळ केवळ काढणे नव्हे, तर त्याची वाहतूक, विल्हेवाट आणि साठवणुकीसाठीही निश्चित आराखडा तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. CSR (Corporate Social Responsibility) निधीच्या माध्यमातूनही गाळ काढण्याच्या कामासाठी मदतीचा पर्याय तपासावा, असा मार्गदर्शक संकेत त्यांनी दिला.

(हेही वाचा – Hamas Attack on Israel : इस्रायल अजूनही अशांतच; हमासकडून पुन्हा हल्ला, ७ सैनिकांचा मृत्यू)

मेरी संस्थेचे प्रदूषण सर्वेक्षण – धोका अधोरेखित

पवई तलावाच्या प्रदूषणाबाबत मेरी (MERI) या संस्थेने सविस्तर सर्वेक्षण केले असून, त्याचे निष्कर्षही लवकरच कृती आराखड्यात समाविष्ट होणार आहेत. पवई, तुळशी आणि विहार हे केवळ जलस्रोत नाहीत, तर मुंबईच्या पर्यावरणाचे ‘फुफ्फुस’ आहेत, हे अधोरेखित करत शेलार यांनी हा विषय फक्त चर्चा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आहे, हे अधोरेखित केलं.

मुंबईच्या नैसर्गिक संपत्तीला संरक्षणाची गरज

गेल्या काही वर्षांत या तलावांतील गाळ आणि जलप्रदूषणामुळे जलसाठा कमी होतोय, जैवविविधतेवर परिणाम होतोय आणि मुंबईसारख्या महानगरासाठी भविष्यातील पाणी संकटाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही मोहीम म्हणजे एक ‘जल जीवन मिशन’ असून, प्रशासनाच्या इच्छाशक्तीची खरी कसोटी आहे. आता मुंबईकरांच्या नजरा आगामी तीन महिन्यांत तयार होणाऱ्या कृती आराखड्यावर खिळल्या आहेत. गाळ हटेल, तलाव वाचतील आणि शहराला श्वास मिळेल हीच अपेक्षा!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.