पावसाळ्यात लालबागकरांच्या अंगावर होणारा अभिषेक थांबला; BMC ने पुलावर केले ‘हे’ काम

771
CC Road : मालाडमधील लगून रस्त्याच्या विस्तारातील अडथळा होणार दूर; टाटा पॉवर कंपनीने दर्शवली 'ही' तयारी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून पावसाचे पाणी साचून राहण्याचे प्रकार घडत असल्याने तसेच पादचाऱ्यांसह गणेश भक्तांच्या अंगावर पुलावरील पाणी पडण्याचा प्रकार घडत असल्याने लालबागकर त्रस्त होते. अखेर ही समस्या आता दूर झाली असून लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी बदलण्यात आल्याने गणेश भक्तांसह इतर पादचाऱ्यांवर होणाऱ्या पाण्याचा अभिषेक आता थांबला जाणार आहे. मुंबई शहर विभागामधील शीव किंग सर्कल भागातील तुळपुळे उड्डाणपुलावरील रस्त्यांचा भाग खराब झाला असून पुलावरील पृष्ठभागातील प्रसारण सांध्यांमधील खराब रबरी सील बदलणे व प्रसारण सांध्यांची दुरुस्तीची मागणी होत आहे. (BMC)

(हेही वाचा – Pune Metro २ च्या कामाला गती; केंद्राचा ३६३२ रुपयांचा निधी मंजूर)

तसेच माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपुलावरील रस्त्यामधील भाग खराब झाला असून या भागाचे पुर्नपृष्ठीकरण करण्याचीही मागणी होत आहे. याशिवाय लालबाग उड्डाणपुलावर पावसाळ्या साचणाऱ्या पाण्याबाबतही निष्कर्ष समोर आला होता. यामध्ये या पुलावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या बहुतेक ठिकाणी खराब झाल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यामधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे खालून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांवर तसेच गणेशोत्सवादरम्यान जमणाऱ्या भाविकांच्या अंगावर साचलेले पाणी पडत असे. परिणामी पुलाखालून जाणाऱ्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो तसेच बऱ्याच वेळा पुलावर पाणी साचले जात होते. (BMC)

(हेही वाचा – World Anti-Drug Day : व्यसनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेचा असा प्रयत्न…; व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढतेय संख्या)

त्यामुळे लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी आणि इतर पुलांवरील रस्त्यांचे बांधकाम आदींचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे पावणे पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या तिन्ही पुलांच्या दुरुस्ती कामांसाठी रुनुजा देव कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पुल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी लालबाब पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी खराब झाल्या होत्या. या खराब पर्जन्य जलवाहिनी आता बदलण्यात आल्या असून यामुळे पुलावर पाणी साचणार नाही आणि खाली लोकांच्याही अंगावर पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तुळपुळे पुलाची कामे हाती घेतली खड्डे आणि रस्त्याच्या पृष्ठीकरणाची कामे पूर्ण केली जात आहे, तसेच इतर कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नानालाल मेहता पुलाचेही काम हाती घेण्यात येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.