-
प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही भूमी. आता याच ठिकाणी इतिहास नव्याने घडणार आहे. राज्य सरकारने या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला हिरवा कंदील दिला. (Sangameshwar)
स्मारकाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण शेलार यांच्यासमोर करण्यात आले. तब्बल ५ एकर क्षेत्रात हे स्मारक उभारले जाणार असून, पार्किंग आणि इतर सुविधा यासाठी अतिरिक्त २ एकर जागा शासनाने निश्चित केली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक “स्टॅच्यू ऑफ युनिटी”च्या धर्तीवर उभारावे, अशी मागणी करत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अधिक भव्यदिव्य स्वरूप देण्याची सूचना केली होती. (Sangameshwar)
या पार्श्वभूमीवर ॲड. शेलार यांनी दालनात बैठक घेतली. त्यांनी संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाच्या कामाला तत्काळ सुरुवात करण्याचे निर्देश दिले, तसेच परिसरातील पर्यटक सेवा, सुविधा आणि विकास योजना यांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. (Sangameshwar)
या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इतिहासाचा नवा अध्याय आता संगमेश्वरात कोरला जाणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक या भूमीच्या शौर्यकथेचे जिवंत प्रतीक ठरणार आहे! (Sangameshwar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

