State Govt. Decision : शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय

216
State Govt. Decision : शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय
State Govt. Decision : शाळेच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय

शाळेच्या आवारात असणाऱ्या पानटपऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईला सुरुवात केली असून शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय सरकारने (State Govt. Decision) घेतला आहे, अशी माहिती मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आधीपासूनच विभागाने कारवाई सुरू केली आहे. आता अन्न व औषध प्रशासनाला कामाचे टारगेट दिले आहे. राज्यात पनीर, तेल, औषधांमध्ये सुरू असलेल्या गैरकारभारावर कारवाई सुरू केली आहे. तसेच राज्यातील पानटपऱ्यांवरही कारवाई झाली आहे. तसेच शाळेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

(हेही वाचा – Hotels in Nainital Mall road : नैनितालमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल तर ‘या’ हॉटेलचा विचार नक्की करा)

“१४ विभागांनी एकत्र येऊन राज्यात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अॅण्टीबायोटिकमध्ये बनावट औषधे बनवल्याचे समोर आले आहे, यावरही कारवाई केली आहे. आम्ही एक बिल पास केलं आहे. ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेलं आहे, तो कायदा झाला तर आपण आरोपींवर मोठी कारवाई करू शकतो तसेच आता इथून पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे. राज्यात गुटखा बंदी पूर्णपणे करायची आहे. यासाठी मी काम करत आहे, असंही मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

गोंदियामध्ये मोठी कारवाई…
गेल्या काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाने गोंदियामध्ये मोठी कारवाई केली होती. बंदी असताना अवैधरीत्या दुकानात साठवून ठेवलेला १३६.७०२ किलो सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून जप्त केला. देवरी येथील दुर्गा चौक बाजार लाइनमधील विशाल किराणा दुकान येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे, तर भिवंडी शहरातून गुटख्याचा साठा जप्त केला होता. भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.