Benelli 302S : बेनेलीच्या ‘स्ट्रीटफायटर’ बाईकला मिळालाय फेसलिफ्ट

बेनेली कंपनीची नवीन ३०२एस बाईक एप्रिल महिन्यात भारतात लाँच होईल. 

464
Benelli 302S : बेनेलीच्या ‘स्ट्रीटफायटर’ बाईकला मिळालाय फेसलिफ्ट
  • ऋजुता लुकतुके

बेनेली या इटालियन बाईक मेकर कंपनीने २०१७ मध्ये जगभरात टीएनटी ३०० या जुन्या बाईकचं उत्पादन बंद करून ३०२एस ही नवीन बाईक रस्त्यावर आणली. फ्लुरोसंट ग्रीन या नवीन रंगात आणलेल्या या बाईकला कंपनीने कौतुकाने बेनेली स्ट्रीटफायटर म्हटलं होतं ३०० सीसी क्षमतेची ही बाईक २०२१ मध्ये भारतात आली आणि अल्पावधीत लोकप्रियही झाली. आता तिचं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येतंय. (Benelli 302S)

एप्रिल महिन्यात भारतीय बाजारपेठांमध्ये नवीन बेनेली ३०२एस ही बाईक दिसू लागेल. आधीच्या टीएनटी गाडीच्या मानाने या बाईकमध्ये बरेच बदल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेड आणि टेल लँपसाठी आधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. आणि हँडलवरील सेमी डिजिटल डिस्प्ले जाऊन आता पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले आला आहे. ३०२ सीसी क्षमतेचं ट्विन इंजिन या गाडीत आहे. आणि त्यातून ३८पीएस ऊर्जा निर्मिती होऊ शकते. आणि गाडीचं मायलेजही २३ किमी प्रती लीटर असं सुधारलेलं आहे. आधीच्या १४ लीटरच्या इंधनाच्या टाकीच्या तुलनेत नवीन बाईकमध्ये १६ लीटरची टाकी आहे. (Benelli 302S)

(हेही वाचा – Honda CB500X : होंडाच्या नवीन बाईकची भारतात डिलिव्हरी सुरू)

बेसिक मॉडेलची किंमत इतक्या रुपयांपासून सुरू

२०२१ मध्ये एकाच व्हेरियंटमध्ये ही गाडी भारतात लाँच झाली होती तेव्हाचा हा फोटो आहे. रंगसंगती आताही हीच असणार आहे. कारण, तरुणांना आवडलेला हा रंग ठरलाय. आणि त्याने बेनेली ३०२एस ला एक ओळख मिळाली होती. गाडीचं वजन २०९ किलो आहे. आणि या गाडीला डबल डिस्क ब्रेक यंत्रणा बसवण्यात आली आहे. (Benelli 302S)

टीएनटी गाडीच्या मानाने या गाडीची किंमत फक्त १० ते १५ हजार रुपयांनी जास्त आहे. ३०२एस बेसिक मॉडेलची किंमत ३,२३,००० रुपयांपासून सुरू होतेय. आणि या गाडीची स्पर्धा असेल ती बीएमडब्ल्यू जी ३१० आर, केटीएम ३९० ड्यूक आणि होंडा सीबी ३०० आर या बाईकशी. (Benelli 302S)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.