Hotels in Nainital Mall road : नैनितालमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल तर ‘या’ हॉटेलचा विचार नक्की करा

नैनितालमध्ये चांगलं हॉटेल शोधायचं कसं हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचाच. 

183
Hotels in Nainital Mall road : नैनितालमध्ये पर्यटनासाठी जाणार असाल तर ‘या’ हॉटेलचा विचार नक्की करा
  • ऋजुता लुकतुके

हिमालय पर्वत रांगांपासून फक्त २७६ किलोमीटर दूर असलेलं आणि कुमान पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं नैनिताल (Nainital) हे उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे. आणि राज्याची शीतकालीन राजधानीही आहे. पर्यटकांचा ओढा इथं १२ ही महिने असतो. त्यामुळे कधीही नैनितालला जाण्याची इच्छा असेल तर त्याचं नियोजन आधीच केलेलं बरं. कारण, तिथली गर्दी ही ठरलेलीच. पण, नैनी तलाव आणि प्रसिद्ध मॉल रोड परिसरातही इथं खूप चांगली हॉटेल उपलब्ध आहेत. सगळ्यांना परवडतील अशी आणि फाईव्ह-स्टार सुविधा असलेली अशी सगळी हॉटेल नैनितालमध्ये पाहायला मिळतात. (Hotels in Nainital Mall road)

पण, राहण्यायोग्य चांगली हॉटेल नैनितालमध्ये शोधायची कशी ते पाहूया. 

सर्च इंजिन 

कुठल्याही प्रसिद्ध ठिकाणी चांगलं हॉटेल शोधण्यासाठी तुम्ही गुगल, बिंग, याहू, आस्क डॉट कॉम अशा सर्च इंजिनची मदत तुम्ही यासाठी घेऊ शकता. तिथे जाऊन हॉटेल्स निअर मॉल रोड नैनिताल, असं तुम्हाला टाईप करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं बजेट ठरलेलं असेल तर अंडर ५०००, अंडर २००० असे शब्दही तुम्ही यात टाकू शकता. खाली परिसरातील सर्व हॉटेलची यादी येईल. त्यात फोटो आणि इतर ग्राहकांनी दिलेले रिव्ह्यू पाहून तुम्ही तुम्हाला आवडेल असं हॉटेल निवडू शकता. त्या हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आणि त्यांचे दर हॉटेलच्या वेबसाईटवर दिलेले असतात. ते पाहून आणि गरज भासल्यास हॉटेलच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही चौकशीही करू शकता. (Hotels in Nainital Mall road)

अलीकडे ऑनलाईन बुकिंगची सोय जवळ जवळ सगळ्याच हॉटेलमध्ये आहे. किंवा तुम्ही प्रत्यक्ष जागा पाहूनही ठरवू शकता. नैनी आणि दाल लेक जवळही अनेक हॉटेलचा पर्याय आहे. काही हॉटेल तर अल्प दरात तुम्हाला साईट सिईंग आणि घोड्यांची रपेट तसंच इतर मनोरंजनाची साधनही पुरवतात.  (Hotels in Nainital Mall road)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेल आणि सर्फराझ यांचं पदार्पण जवळ जवळ निश्चित)

ट्रॅव्हल ॲप 

अलीकडे खासकरून तरुण पिढी, ट्रॅव्हल ॲपचा पर्याय चटकन निवडते. आणि त्याचे फायदेही आहेत. मेक माय ट्रिप, अगोडा, यात्रा यासारखी ॲप तुम्हाला हॉटेलचे अनेक पर्याय तर देतातच. शिवाय तुम्हाला बुकिंगवर चांगली सवलतही देऊ करतात. इतकंच नाही तर रेल्वे आणि विमानाचं बुकिंग एकसाथ केलं तर तुम्हाला दरही कमी पडतो. (Hotels in Nainital Mall road)

या ॲपवरून तुम्हाला तुमच्या ट्रिपचं एखादं चांगलं पॅकेजही मिळू शकतं. त्यासाठी तुम्ही नियमित वापरत असलेलं ॲप उघडून तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. यात तुमचं बजेट, किती दिवस राहणार आणि किती जणांसाठी बुकिंग करायचं आहे याची माहिती तुम्हाला द्यायची असते. आणि मग ते ॲप तुमच्यासमोर अक्षरश: हजारो पर्याय ठेवते. आणि क्षणार्धात तुमचं ऑनलाईन बुकिंगही करून देते. इथंही बुकिंग करण्यापूर्वी रिव्ह्यूज नक्की वाचा. (Hotels in Nainital Mall road)

पर्यटनविषयक वेबसाईट 

यामध्ये खासकरून उत्तराखंड राज्याच्या पर्यटन विभागाची वेबसाईट ही जास्त विश्वसनीय मानली पाहिजे. या वेबसाईटवर सरकारी रेटिंगही दिलेलं असतं. किंवा अगदी सरकारी पर्यटन विभागाकडून चालवण्यात येत असलेल्या हॉटेलची माहितीही यात असते. इथं दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्ही हॉटेल व्यवस्थापनाशी बोलू शकता. (Hotels in Nainital Mall road)

(हेही वाचा – Manoj Jarange यांची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्त्राव सुरु)

थेट शोध 

काही कारणांनी आधी बुकिंग करु शकला नसाल आणि कार्यक्रम ऐन वेळी ठरलेला असेल तरीही काळजी करण्याचं कारण नाही. नैनितालमध्ये (Nainital) दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आणि त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या आणि बजेटच्या सोयी विपुल प्रमाणात इथं आहेत. त्यामुळे ऐन वेळी तिथे जाऊनही तुम्ही बुकिंग करू शकता. (Hotels in Nainital Mall road)

त्यामुळे हॉटेलमधील खोल्या आणि इतर सुविधा प्रत्यक्ष पाहून तुम्ही आवडेल असं हॉटेल निवडू शकता. तसंच इथं थोडी घासाघीसीची संधीही असते. भारतातील सर्व फाईव्ह स्टार ब्रँडची हॉटेल नैनितालमध्ये (Nainital) उपलब्ध आहेत. तसंच बजेट अकोमोडेशनही आहे. (Hotels in Nainital Mall road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.