Mumbai Airport : मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे खळबळ

71
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे खळबळ
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे खळबळ

रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा अलर्ट झाल्या. (Mumbai Airport) रविवारी विमानतळावर निळ्या पिशवीत बॉम्ब असल्याचे सांगून बनावट कॉल करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई पोलीस अधिकारी आणि बॉम्बशोधक पथकाने विमानतळावर पोहोचून तातडीने तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर तपासात काहीही आढळले नाही. सध्या पोलीस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीतील पालम येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशत निर्माण झाली होती.

(हेही वाचा – Ajit Pawar : शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकाऱ्यांनी करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा)

भारत आणि कॅनडातील सातत्याने बिघडत चाललेल्या राजकीय संबंधांमुळे खलिस्तानी संघटनांबाबत गुप्तचर यंत्रणाही सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे फोनवरून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके न सापडल्याने मुंबई पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकारामुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Mumbai Airport)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.