खात्यात ३००० रुपये आले नाहीत? Ladki Bahin Yojana चा पैसा मिळवण्यासाठी महिलांना अखेरची सुवर्णसंधी!

396
Ladki Bahin योजनेच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
Ladki Bahin योजनेच्या नावाखाली फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
  • प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana          ​राज्य शासनाची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमाही झाली आहे; मात्र दुसरीकडे, पात्र असूनही हजारो महिलांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही. बँक खात्याशी ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळेच या महिलांचे पैसे रखडल्याचे समोर आले असून, आता अशा महिलांसाठी शासनाने आणखी एक अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. (Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – Kalyan-Dombivli मध्ये २४ तासांत २ मोठ्या चोऱ्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण)

​यापूर्वी शासनाकडून ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. अगदी ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही प्रक्रिया करण्याची मुभा महिलांना होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीअभावी ज्या लाडक्या बहिणींची ही प्रक्रिया करायची राहून गेली आहे, त्यांचे नाव लाभार्थी यादीतून कायमचे कट होऊ नये म्हणून ही विशेष संधी देण्यात आली आहे. आता ही प्रक्रिया जुन्या पद्धतीनुसार ऑनलाईन मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा स्वतःहून इंटरनेटवरून करता येणार नाही, हे महिलांनी प्रामुख्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. (Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – खासदार Nagesh Ashtikar यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय चर्चांवर थेट स्पष्टीकरण)

​ज्या महिलांचे पैसे रखडले आहेत, त्यांनी आता तात्काळ आपल्या जवळच्या ‘जिल्हा महिला विकास विभाग’ कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. या शासकीय कार्यालयात जाऊन महिलांना आपली आवश्यक कागदपत्रे आणि बँक तपशील सादर करावा लागेल. तिथल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. ही प्रशासनाने दिलेली अगदी शेवटची संधी असून, यामध्ये दुर्लक्ष केल्यास पात्र महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत यादीतून कायमचे हटवले जाऊ शकते. त्यामुळे थकीत ३००० रुपये मिळवण्यासाठी आणि योजनेचा लाभ पुढेही सुरू ठेवण्यासाठी महिलांनी या सुवर्णसंधीचा तात्काळ फायदा घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.