सरकारी नोकरीची मोठी संधी! २०६५ रिक्त पदांसाठी भरती

111

लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या २ हजार ०६५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. १२ मे २०२२ पासून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर जाऊन इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२२ आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याते प्रस्तावित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा )

अर्ज करण्यासाठी नियम व अटी

  • पदांचे नाव – नर्सिंग ऑफिसर, वरिष्ठ संशोधन सहायक, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक सहायक, सहायक तांत्रि अधिकारी, कनिष्ठ रसायनशास्त्र, कृषी सहायक, वरिष्ठ सहायक, सहायक शिक्षक, सहायक अधिकारी
  • पदसंख्या – २ हजार ०६५
  • शैक्षणिक पात्रता – १० वी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ मे २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२२
  • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
  • New Project 7 8

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल. Registration झाल्यावर लॉगिन करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.