रेशन दुकानात लवकरच येणार 4G ई – पॉस मशीन

68

सध्या धान्य दुकानात‎ वापरात असलेल्या जुन्या टू-जी‎ ई-पॉस मशीनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी रेशन‎ दुकानदाराकडून सातत्याने करण्यात येत होत्या.

या तक्रारींची दखल घेत आता‎ पुरवठा विभागाकडून रेशन‎ दुकानदारांना लवकरच फोरजी ई‎ -पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या‎ जाणार आहेत. त्यामुळे धान्य‎ वितरण व्यवस्थेत गतिमानता येणार‎ आहे. लाभार्थ्यांना आता तांत्रिक‎ अडचणींचा सामना करावा‎ लागणार नाही. त्यामुळे नागरिकांना‎ त्यांच्या वाट्याचे रेशन तत्काळ‎ मिळणार आहे.‎

१ मे २०१८ पासून ई-पॉस‎ मशीनच्या माध्यमातून रेशनकार्ड‎ धारकांना धान्य वितरण केले‎ जात आहे. मात्र, याकरिता‎ असलेल्या ई- पॉस मशिनमध्ये‎ तांत्रिक अडचणीमुळे त्वरित थंब‎ इम्प्रेशन होत नव्हते. एका‎ शिधापत्रिका धारकाला १० ते १५‎ मिनिटे वेळ द्यावा लागत होता.‎ अनेक ई-पॉस मशीन मधील सीम‎ कार्ड निरुपयोगी झाले असून, रेशन‎ दुकानदारांना मोबाइलद्वारे हॉट स्पॉट‎ वापरून धान्य वितरण करावे‎ लागत होते. मशीन मधील तांत्रिक‎ बिघाडामुळे रेशन दुकानदारांना‎ शिधा वाटप करताना अडचणी‎ आल्या. या पार्श्वभूमीवर रेशन‎ दुकानात आता टूजीऐवजी फोरजी‎ ई-पॉस मशीन उपलब्ध करून‎ दिल्या जाणार आहेत.

तसेच ग्राहक‎ आणि रेशन दुकानदार यांच्यात‎ धान्य वितरणातील‎ विस्कळीतपणामुळे अनेकदा‎ वादही होतात. त्यामुळे आता रेशन‎ वितरण प्रणालीत पारदर्शकता‎ येणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरण‎ करताना येणाऱ्या अडचणींवर‎ आता मात करता येणे शक्य होणार‎ आहे. ग्राहकांची होणारी धान्य‎ घेण्यासाठी गर्दी आणि लांबच लांब‎ रांग आता काही अंशी कमी होणार‎ आहे. लवकरच याची‎ अंमलबजावणी होईल, असे‎ पुरवठा विभागाने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.