Raj Thackeray PC on Toll Issue : ४ मिनिटांच्या वर कोणतेही वाहन टोल नाक्यावर थांबणार नाही; शिवतीर्थावरील बैठकीत काय ठरले

5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.

82
Raj Thackeray PC on Toll Issue : ४ मिनिटांच्या वर कोणतेही वाहन टोल नाक्यावर थांबणार नाही; शिवतीर्थावरील बैठकीत काय ठरले
Raj Thackeray PC on Toll Issue : ४ मिनिटांच्या वर कोणतेही वाहन टोल नाक्यावर थांबणार नाही; शिवतीर्थावरील बैठकीत काय ठरले

टोल नाक्यावरील यलो लाईनच्या पुढे कोणतेही वाहन थांबणार नाही. त्यापुढच्या सर्व गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. त्यामुळे ४ मिनिटांच्या वर कोणत्याही वाहनाला टोल नाक्यावर थांबणार नाही. पुढचे 15 दिवस मुंबई-ठाण्याच्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि मनसेचे कॅमेरे लावले जातील. त्याने किती गाड्या या टोल वरून जातात, हे कळेल. ही व्हिडिओग्राफी १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. 5 रुपये वाढीव टोलबाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा आहे. त्यानंतर टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या आणि बैठकीत झालेले मुद्दे पत्रकार परिषदेत सांगितले. राज ठाकरे यांनी सांगितलेल्या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (Raj Thackeray PC on Toll Issue)

(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule : हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या – चंद्रशेखर बावनकुळे)

राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या बैठकीत काय ठरले 

दरम्यान, बैठकीत महाराष्ट्रातील टोलसंदर्भात नेमकं काय ठरलंय? याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगितले. त्यानुसार…

१. पुढचे १५ दिवस टोलच्या सर्व एंट्री पॉइंट्सवर सरकारकडून कॅमेरे लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचेही पक्षाचे कॅमेरे लागतील. त्यामुळे किती गाड्यांची ये-जा होतेय त्या मोजल्या जातील.

२. करारात नमूद केलेल्या सर्व सोयीसुविधा, स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, एक रुग्णवाहिका , क्रेन, प्रकाशयंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय, तक्रार वही या गोष्टी टोलनाक्यांवर असतील. मंत्रालयात यासंदर्भात एक कक्ष काम करेल.

३. करारातील नमूद सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. नामांकित आयआयटीच्या लोकांकडून ते केले जाईल. सरकारी यंत्रणेकडून ते होणार नाही.

४. ठाण्याला झालेली टोलवाढ रद्द करण्याच्या दृष्टीने सरकारला महिन्याभराचा अवधी पाहिजे. त्यासंदर्भात महिन्याभरात निर्णय घेतला जाईल.

५. प्रत्येक टोलनाक्यावर पिवळी रेषा होती. आता ती व्यवस्था पुन्हा सुरू केली जाईल. २०० ते ३०० मीटरपर्यंत त्या रेषेवर रांग गेली, तर त्यारेषेपुढच्या टोलनाक्यापर्यंतच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. ४ मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील. टोलवरचे कर्मचारी अरेरावीने वागतात त्यावर वचक बसेल.

६. टोलनाक्यावर जर फास्टटॅग चालला नाही, तर तुम्हाला एकदाच पैसे भरावे लागतील. सध्या तिथे एकदा पैसे घेतात आणि पुढे पुन्हा फास्टटॅगनुसार पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. तसं झालं तर तुम्हाला तक्रार करता येईल.

७. कितीचे टेंडर आहे, टोलचा आकडा किती आहे, रोजचे वसूल किती होतायत आणि उरले किती हे मोठ्या डिजिटल बोर्डावर दोन्ही बाजूला रोजच्या रोज दाखवले जाईल.

८. ठाण्याचा आनंदनगर टोलनाका – ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोलनाक्यावरून ऐरोलीच्या टोलनाक्यावर जायचं असेल, तर तो टोल एकदाच भरावा लागेल. सध्या दोन्ही टोलनाक्यांवर टोल भरावा लागतो. महिन्याभरात हा निर्णय घेतला जाईल. त्याचे सर्वेक्षण केले जाईल.

९. सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल रद्द करण्यासंदर्भात सरकार महिन्याभरात निर्णय सांगेल.

१०. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे कॅग ऑडिट केले जाईल.

११. टोलनाक्यांवर अवजड वाहने कोणत्याही लेनमध्ये येतात. ती सर्व वाहनं महिन्याभराच्या आता योग्य पद्धतीने नियोजन करून टोलवरून सोडली जातील.

१२. टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सवलत मासिक पास उपलब्ध करून दिले जातील. (Raj Thackeray PC on Toll Issue)

टोलसंदर्भातले सरकारी करार २०२६मध्ये संपत आहेत

“काल ९ वर्षांनंतर मी या विषयासाठी सह्याद्री अतिथीगृहात गेलो. तेव्हा सह्याद्रीवर पृथ्वीराज चव्हाण होते. तेव्हा काही गोष्टी ठरल्या, त्या सुरू झाल्या. पण नंतर त्यातल्या गोष्टी मागे पडल्या. तेव्हाच मला कळलं होतं की टोलसंदर्भातले सरकारी करार २०२६मध्ये संपत आहेत. पण त्यात सुधारणांच्या सूचना मी केल्या होत्या. मग ९ वर्षांनंतर पुन्हा तो विषय ऐरणीवर आला. कारण ठाण्यातल्या ५ एंट्री पॉइंट्सवर पैसे वाढवले गेले. अविनाश जाधव वगैरे आमचे सहकारी उपोषणाला बसले आणि तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. फडणवीसांनी म्हटलं की महाराष्ट्रात कोणत्याच टोलवर चारचाकी, तीनचाकी वाहनांना टोल नाहीये. त्यानंतर सगळीकडे चलबिचल सुरू झाली. मग फक्त टोल वसूल करणाऱ्यांकडेच टोल जातोय की काय? त्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली”, असे राज ठाकरे म्हणाले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली, त्यात काही गोष्टी ठरल्या. काल लेखी स्वरूपात काही गोष्टी आल्या नव्हत्या. आजच्या बैठकीत लेखी स्वरूपात काही गोष्टी ठरल्या आहेत. टोलसंदर्भातील ऍग्रिमेंट 2026 पर्यंत संपणार आहे. त्यात आता काही करता येत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray PC on Toll Issue)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.