Raigad : बचावकार्य करतांना पोलीस उपनिरीक्षक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

88
Raigad : बचावकार्य करतांना पोलीस उपनिरीक्षक यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

रायगड (Raigad) जिल्ह्याला इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर पुन्हा एक धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उरणतालुक्यातील चिरनेर या गावी पूरग्रस्तांना मदत करतांना पोलीस उपनिरीक्षक विशाल राजवाडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई व रायगड पोलिसांना दुःख अनावर झाले असून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे.

रायगड (Raigad) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवार १९ जुलै रोजी रायगड (Raigad) जिल्ह्यातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर रात्री उशिरा दरड (Irshalgad Landslide) कोसळली. ही दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला असूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत)

रायगडातील (Raigad) इर्शाळवाडी ही अत्यंत दुर्गम भागातील वस्ती आहे. त्यामुळे तेथील बचावकार्यात अडचण येत आहे. या वाडीत एकूण ४० ते ४७ घरं होती. त्यातील १४ ते १७ घरांवर दरड कोसळली आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रानातील अनेक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.