Pune-Varanasi train: पुणेकरांचे काशीदर्शन सोपे झाले, पंतप्रधानांनी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला दाखवला हिरवा झेंडा

85
Pune-Varanasi train: पुणेकरांचे काशीदर्शन सोपे झाले, पंतप्रधानांनी 'अमृत भारत एक्सप्रेस'ला दाखवला हिरवा झेंडा
Pune-Varanasi train: पुणेकरांचे काशीदर्शन सोपे झाले, पंतप्रधानांनी 'अमृत भारत एक्सप्रेस'ला दाखवला हिरवा झेंडा

Pune-Varanasi train: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या संसदीय क्षेत्रात, वाराणसीमध्ये ६,३५० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या दौऱ्यात त्यांनी रेल्वे, रस्ते, आरोग्य आणि पर्यटनाशी संबंधित महत्त्वपूर्ण भेट काशीवासीयांना दिली. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदिल

पंतप्रधानांनी दोन आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांचे उद्घाटन केले.
१. बनारस – हडपसर (पुणे): ही गाडी काशीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आयटी राजधानीशी थेट जोडली जाईल. यामुळे भाविकांना काशी विश्वनाथ धाम येथे येणे सोपे होईल.
२. अयोध्या- लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई): ही गाडी अयोध्या श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र आणि मुंबईला जोडेल. यासह देशात आता एकूण ६६ अमृत भारत एक्सप्रेस कार्यान्वित झाल्या आहेत.

रेल्वे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार…
वाराणसी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शनदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. यात गंगा नदीवर रेल्वे सह रस्ते पुलाचा समावेश आहे.

यामुळे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि नॅशनल हायवे-१९ वरील वाहतूक कोंडी कमी होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.