Pune Accident : पुण्यात एसटी बसची सात वाहनांना धडक, सहाजण जखमी

भरधाव एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना या अपघातात आठ वर्षीय मुलासह सहाजण जखमी झाले आहेत.

75
Pune Accident : पुण्यात एसटी बसची सात वाहनांना धडक, सहाजण जखमी
Pune Accident : पुण्यात एसटी बसची सात वाहनांना धडक, सहाजण जखमी

एसटी बसने सात वाहनांना धडक दिल्याची घटना पुण्याच्या फातिमानगरमध्ये घडली आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.पोलिसांनी एसटी बसचालकला (ST Bus Accident) ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (२१ नोव्हेंबर) रात्री घडली.(Pune Accident)

भरधाव एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना या अपघातात आठ वर्षीय मुलासह सहाजण जखमी झाले आहेत. हरी गोपाळ बांगरिया (वय ४०, रा. बिबवेवाडी), काका वाळुंजकर (वय ४०), अश्विनी वाळुंजकर (वय ३०), राजवर्धन वाळुंजकर (वय ८, तिघे रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगाेला) याला ताब्यात घेतले आहे. Pune Accident

(हेही वाचा : Gateway of India Viral Video : समुद्रात कचरा टाकणाऱ्याला पोलिसांनी घडवली अद्दल, ‘इतक्या’ रुपयांचा आकारला दंड)

ही एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने पाच दुचाकींना धडक दिली. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी याला ताब्यात घेतलंय. या बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी यावेळी होते.

अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
दरम्यान,ब्रेक न लागल्याने बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यात काही कारचा चक्काचूर झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. तर चार ते पाच नागरीक जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.