Gateway of India Viral Video : समुद्रात कचरा टाकणाऱ्याला पोलिसांनी घडवली अद्दल, ‘इतक्या’ रुपयांचा आकारला दंड

या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.

161
Gateway of India Viral Video : समुद्रात कचरा टाकणाऱ्याला पोलिसांनी घडवली अद्दल, 'इतक्या' रुपयांचा आकारला दंड
Gateway of India Viral Video : समुद्रात कचरा टाकणाऱ्याला पोलिसांनी घडवली अद्दल, 'इतक्या' रुपयांचा आकारला दंड

मुंबई मधील गेटवे ऑफ इंडियाच्या येथे एक तरुण कचरा समुद्रात टाकलेला फोटो सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाला. त्याच्या या कृत्यावर अनेक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मात्र मुंबई पोलिसांनी या तरुणाला शोधून काढून त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबद्दल पोलिसांचेही कौतुक होत आहे. (Gateway of India Viral Video )

आपलं घर सुंदर ठेवायचं आणि कचरा मात्र शेजारच्याच्या दारात किंवा सार्वजनिक रस्त्यावर टाकायचा ही अनेकांची मानसिकता असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहून जाताना आपल्याला अनेकदा नाक धरून जावं लागतं. अशाच प्रवृत्तीच्या या तरुणाला मुंबई चांगलीच अद्दल घडवली आहे.

नेमका प्रकार काय
भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया म्हणजे नेहमी पर्यटकांनी गजबजलेलं ठिकाण. या ठिकाणी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र एक व्यक्ती टॅक्सीतून गेट वे ऑफ इंडियाजवळ आला. त्या व्यक्तीने त्याच्यासोबत मोठा कचरा आणला होता. तो सर्व कचरा त्या व्यक्तीने निर्लज्जपणे समुद्रात फेकून दिला. त्यानंतर तो निघून घेला. मात्र कुणीतरी त्याचा एक फोटो काढला. अनेक नागरिक तसेच मान्यवरांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला होता. (Gateway of India Viral Video)

(हेही वाचा : Kartiki Ekadashi 2023 : ठरलं ! विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते)

असा घेतला शोध
या छायचित्राचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी सदर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून सदर व्यक्तीची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.