PUNE: “पाच वर्षे पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या”; पुण्यात झळकले बॅनर्स

जुन्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

127
PUNE: "पाच वर्षे पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन द्या"; पुण्यात झळकले बॅनर्स

मागील काही वर्षात राज्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी बघायला मिळाल्या. याच काळात अनेक राजकीय पक्ष फुटले तसेच अनेक नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचं बघायला मिळालं; पण आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलच तापलं आहे. अशातच पुण्यातील (Pune) राजकीय बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

‘जागृत पुणेकर’, या नावाने लावण्यात आलेल्या या बॅनर्समध्ये ५ वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन देणाऱ्या उमेदवारालाच आपलं मत द्या, असं आवाहन करण्यात आलं आहे. जुन्या पुणे शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

(हेही वाचा – Financial Changes : १ एप्रिलपासून तुमचे हे पैशांचे व्यवहार बदलणार)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.