Pune – Bangalore Highway Accident : चार वाहनांचा अपघात; दोघांचा मृत्यू

मोठ्या कंटेनरची लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक

69
Pune - Bangalore Highway Accident : चार वाहनांचा अपघात; दोघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून सतत रस्ते (Pune – Bangalore Highway Accident) अपघात होत आहेत. पुण्यामधील नवले पूल तर सध्या ‘अपघाताचा स्पॉट’ बनला आहे. अशातच आज म्हणजेच शनिवार ११ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा पुण्यामध्ये एक भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिक माहितीनुसार, पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दरी पुलावर एक अपघात (Pune – Bangalore Highway Accident) घडला. मोठ्या कंटेनरची लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक होऊन हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पुणे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

(हेही वाचा – Sea Link Accident : मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ३ ठार, ९ जखमी)

अपघात (Pune – Bangalore Highway Accident) स्थळी अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवले पूलावर हा अपघात पहाटे पावणे चारच्या दरम्यान झाला.

असा झाला अपघात

साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक (Pune – Bangalore Highway Accident) फेल झाल्याने हा कंटनेर समोरच्या टेम्पोला जाऊन धडकला. त्यानंतर डिव्हायडर तोडून समोरच्या लेनवर पलटी झाला. बाजूच्या रस्त्यावरील साताराच्या दिशेने निघालेल्या बसला देखील कंटेनची जोरदार धडक बसली. या अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Pune – Bangalore Highway Accident)

(हेही वाचा – Cleaning Tips : या टिप्स फाॅलो केल्याने घराची साफसफाई करणे होईल सोपे)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.