Pune Auto Fare Hike: १ सप्टेंबरपासून पुण्यात रिक्षा प्रवास महागणार, प्रति किमी दर किती रुपयांनी वाढला? जाणून घ्या…

74
MMR: रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, नवीन दरानुसार किमान भाडे किती वाढले? जाणून घ्या...
MMR: रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, नवीन दरानुसार किमान भाडे किती वाढले? जाणून घ्या...

Pune Auto Fare Hike: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ऑटो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ सप्टेंबर २०२६पासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ होणार असून, किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. तसेच प्रति किलोमीटर भाडे १७ रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरटीए बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवीन दर पुणे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षांवर लागू असतील.

२०२१ पासून पुण्यात ऑटोरिक्षा भाड्यात ही चौथी वाढ आहे. २०२१ मध्ये किमान भाडे १८ रुपये होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत आता ते ३० रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या पाच वर्षात किमान भाड्यात सुमारे ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवीन भाडेदर काय असतील?
पहिले १.५ किलोमीटर: ३०  रुपये (पूर्वी २५ रुपये)
प्रत्येक अतिरिक्त किलोमीटर: २० रुपये (पूर्वी १७ रुपये)

भाडेवाढीमागील कारणे
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात सीएनजीच्या किमती, वाहनांच्या देखभाल खर्चात, सुटे भाग, विमा प्रीमियम आणि महागाईत मोठी वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून खाटुआ समितीच्या शिफारशींनुसार नवीन भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. सध्या सीएनजीचा दर प्रति किलो सुमारे ९६ रुपये असून, २०२२ मध्ये तो जवळपास ९१ रुपये होता.

मीटरचे कॅलिब्रेशन बंधनकारक
भाडेवाढ लागू झाल्यानंतर सर्व ऑटोरिक्षांचे मीटर पुन्हा कॅलिब्रेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी चालकांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत प्रत्येक रिक्षाचालकाने अधिकृत भाडे तक्ता (Fare Chart) वाहनात ठळकपणे लावणे आवश्यक असेल, जेणेकरून प्रवाशांना योग्य भाड्याची माहिती मिळेल आणि वाद टाळता येतील.

दीड लाख रिक्षाचालकांना दिलासा
या निर्णयाचा फायदा पुणे जिल्ह्यातील सुमारे १.५ लाख ऑटोरिक्षाचालकांना होणार आहे. मात्र, दुसरीकडे दररोज ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.