Pune Airport: पुणे-लोहगाव विमानतळाचा अनोखा विक्रम, एका महिन्यात ७ लाखांहून जास्त प्रवाशांनी केला प्रवास

पुणे-लोहगाव विमानतळावर नुकतेच एक टर्मिनल उभारण्यात आले आहे.

145
Pune Airport: पुणे-लोहगाव विमानतळाचा अनोखा विक्रम, एका महिन्यात ७ लाखांहून जास्त प्रवाशांनी केला प्रवास
Pune Airport: पुणे-लोहगाव विमानतळाचा अनोखा विक्रम, एका महिन्यात ७ लाखांहून जास्त प्रवाशांनी केला प्रवास

पुणे शहराचा (Pune Airport) विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या सोयीसुविधा आणि प्रकल्प पुणे शहरात येत आहेत. जगभरात पुण्याचे महत्त्व वाढल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान पुणे-लोहगाव विमानतळाने एक अनोखा विक्रम केला आहे.

व्यापार, व्यवसाय, कार्यालयीन कामे, पर्यटन
पुणे शहरातून ऑक्टोबर महिन्यात विक्रमी विमानफेऱ्या झाल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये पुणे विमानतळावरून ५ हजार ४८१ विमान फेऱ्या झाल्या आहेत. यावरून पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे लक्षात येते. केवळ एका महिन्यात ७ लाख ८० हजार ६१८ प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने वाढत आहे. व्यापार, व्यवसाय, कार्यालयीन कामे, पर्यटन यासाठी पुणे विमानतळावरून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.

दिवसाला १८० विमानांचे उड्डाण
पुणे विमानतळावरून दिवसाला १८० विमानांचे उड्डाण होते. पुणे विमानतळावरून दररोज सरासरी ९० विमाने जातात. तेवढीच विमाने पुण्यात येतात. अशा एकूण १८० विमानांची नोंद पुणे विमानतळावरून होत असते. पुण्यातून देशांतील विविध भागांत विमाने जातात.

टेकऑफ आणि लॅण्डींगच्या नवीन सुविधा
विमानप्रवासात विक्रम केला असला, तरी आंतरराष्ट्रीय सेवा पुण्यातून नाही. यामुळे पुणे शहराजवळ पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून विमानतळासाठी जमीन संपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुणे-लोहगाव विमानतळावर नुकतेच एक टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. नवीन टर्मिनलसाठी ५२५ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यात ५ एरोब्रिज तयार केल्यामुळे टेकऑफ आणि लॅण्डींगच्या नवीन सुविधा तयार झाल्या आहेत. यामुळे नवीन टर्मिनलवरून रोज १२० विमाने जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.