Chandrapur: चंद्रपुरात उड्डाणपुलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई

रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत.

118
Chandrapur: चंद्रपुरात उड्डाणपुलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई
Chandrapur: चंद्रपुरात उड्डाणपुलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई

६७व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर (chandrapur) शहरातील उड्डाणपुलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. जणु काही दिवाळी असल्यासारखे चंद्रपूर शहर सजवण्यात आले आहेत.

राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ६७व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. ‘मिशन ऑलिम्पिक २०३६’हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, २६ डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.


(हेही वाचा – INS Imphal : आयएनएस इम्फाळ नौदलात होणार दाखल; ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.