Pune : भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा, ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल

रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत.

61
Pune : भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा, ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Pune : भारत गौरव रेल्वेतील ४० प्रवाशांना विषबाधा, ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल

चेन्नईहून पुण्याकडे (Pune) येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमधील ४० प्रवाशांना विषबाधा झाली. मंगळवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सर्व प्रवाशांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विषबाधेच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चेन्नईहून पुण्याकडे येणारी ही रेल्वे मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकात पोहोचली. तेव्हा रेल्वेमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

(हेही वाचा – My Name is VVS Laxman : ईशान किशन जेव्हा आपलं नाव व्ही व्ही एस लक्ष्मण असल्याचं सांगतो…)

रेल्वेमध्ये सध्या पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र काही रेल्वेगाड्यांमध्ये खानपानाची सोय देण्यात आली आहे. अनेकदा सकाळी पॅक केलेले अन्न सायंकाळी, रात्री देण्यात येते. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.