Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधानांनी देशवासीयांना काय केले आवाहन, ज्यामुळे देशभरातून मिळणार प्रतिसाद

पंतप्रधान मोदी देशवासीयांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी वारंवार विविध आवाहन करत असतात.

163

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासीयांना कायम वेगवेगळे आवाहन करत असतात, ज्याला देशभरातून प्रतिसाद मिळत असतो. असेच एक आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना २०२२ साली केले होते. त्यांनाही स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार देशभरातून नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. यंदाच्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी अशाच प्रकारे आवाहन केले आहे आणि यावेळी त्याला देशवासीय उत्तम प्रतिसाद देतील, अशी शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून यंदाच्या वर्षीही हर घर तिरंगा मोहीम राबण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळीच त्यांच्या ट्विटर खात्यावरून एक ट्वीट केले आहे. “हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया खात्याचे डिपी बदलून भारताचा तिरंगा ठेवावा. सरकारच्या या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया, जेणेकरून देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील, असे हे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गेल्यावर्षीही अशाप्रकारचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत डीपीला तिरंगा झळकावला होता. यंदाही अशाचप्रकारचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. तसंच, त्यांनीही स्वतःच्या अधिकृत खात्याच्या डिपीला तिरंगा लावला आहे.

(हेही वाचा Independence Day: ७७ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज)

काय आहे हर घर तिरंगा मोहीम?

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. हर घर तिरंगा अभियान हा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे. गेल्यावर्षी २२ जुलै २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत पंतप्रधान मोदींनी लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. नागरिकांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ज्यांनी त्यांच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवला आहे ते त्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.