Thane hospital : ठाणे पालिका रुग्णालयातील मृत्यूंची सखोल चौकशी करणार – मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

कळवा येथील ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज हे रुग्णालय 500 खाटांचे आहे. त्यात 17 रुग्णांचा एकाच रात्री मृत्यू झाला.

77

ठाणे महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज या रुग्णालयात Thane hospital शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी रात्रीच 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली. या मृत्यूंची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

एकाच रात्री एवढे मृत्यू हे गंभीर

ठाण्यातील घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन म्हणाले, कळवा येथील ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज हे रुग्णालय Thane hospital 500 खाटांचे आहे. त्यात 17 रुग्णांचा एकाच रात्री मृत्यू होणे गंभीर आहे. हे मृत्यू का झाले? याचा तपास करून पुढील कार्यवाही केली जाईल.

(हेही वाचा Har Ghar Tiranga : मुंबईतील २२४ डाक कार्यालये आणि पाच रेल्वे स्थानकांवर मिळणार राष्ट्रध्वज)

आदित्य ठाकरेंचीही टीकास्त्र

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, महापालिकेच्या रुग्णालयांत औषधे नाहीत, अशी स्थिती आहे. पालिका रुग्णालयातील औषध खरेदी खोळबंली आहे. मात्र, राज्य सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

मनसेही आक्रमक

ठाण्यातील घटनेवरून मनसेही आक्रमक झाला आहे. मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, ठाणे महानगरपालिका रुग्णालयात रात्रीत 17 लोक दगावले. हा नालायकपणा कोणाचा? ठाण्याचे मुख्यमंत्री आणि ठाण्याची दयनीय अवस्था? जनतेने आता तरी डोळे उघडावे. तसेच, रुग्णांच्या मृत्यूला ठाणे पालिकेचे आयुक्तच जबाबदार असल्याची टीका अविनाश जाधव यांनी केली. उद्या पालिका आयुक्तांची भेट घेऊन, या घटनेचा त्यांना जाब विचारणार. उद्या मनसे काय करेल, हे तुम्हाला दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.