Droupadi Murmu : राज्यपालांनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

रम्यान, मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त पुढील दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याची दाखल घेत नागरिकांनी आपल्या इच्छित स्थळी जावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे आयुक्त विजय कुमार मगर यांनी केले आहे.

99
Droupadi Murmu : राज्यपालांनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुणे विमानतळावर स्वागत
Droupadi Murmu : राज्यपालांनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुणे विमानतळावर स्वागत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारपासून (२९ नोव्हेंबर ) तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. मुर्मू या कृषि विद्यापीठ, लष्करी वैद्यकीय महाविद्याल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेटी देणार आहेत. मुर्मू यांचे दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमान तळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, यांनी स्वागत केले. यावेळी महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त पुढील दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याची दाखल घेत नागरिकांनी आपल्या इच्छित स्थळी जावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे आयुक्त विजय कुमार मगर यांनी केले आहे. (Droupadi Murmu)

राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा येथील नौदलाच्या आयएनएस शिवाजी अशा लष्कराच्या संस्थांमधील कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर लोणावळ्यातील नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेला त्या भेट देणार आहेत. तसेच लोणावळ्यातील कैवल्यधाम येथील योगसंस्थेत जाणार आहेत. त्यानंतर थेट एनडीए येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. गुरुवारी (३० नोव्हेंबर) ‘एनडीए’च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळ्याला त्यांची उपस्थिती असणार असून, या वेळी स्नातकांच्या वतीने त्या मानवंदना स्वीकारणार आहेत. त्यानंतर नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन पुण्यातील राजभवन येथे मुक्कामी येणार आहेत. १ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. (Droupadi Murmu)

(हेही वाचा : MLA Disqualification Case : आमदार अपात्रता याचिका 31 डिसेंबरपर्यंत निकाली निघणे अशक्य; विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार ?)

जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
राष्ट्रपती मुर्मू यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपती ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गांवर रंगीत तालीम करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहे. संबंधित रस्त्यांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.