Citizenship Amendment Act : बंगालमध्ये CAA आणणारच; ममतांच्या बंगालमध्ये अमित शाहांचे मोठे विधान

Citizenship Amendment Act : पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेसाठी लाखो रुपये पाठवतात; पण तृणमूल काँग्रेस हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. - अमित शाह

85
Citizenship Amendment Act : बंगालमध्ये CAA आणणारच; ममतांच्या बंगालमध्ये अमित शाहांचे मोठे विधान
Citizenship Amendment Act : बंगालमध्ये CAA आणणारच; ममतांच्या बंगालमध्ये अमित शाहांचे मोठे विधान

आम्ही बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Act, 2019) आणणारच. हा देशाचा कायदा असून तो बंगालमध्ये (Bengal) लागू करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे परखड विधान अमित शाह यांनी केले आहे. बुधवार, २९ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बंगालमध्ये रॅलीला संबोधित केले. त्या वेळी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी West Bengal मधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : आमदार अपात्रता याचिका 31 डिसेंबरपर्यंत निकाली निघणे अशक्य; विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार ?)

गृहमंत्र्यांनी वाचला बंगालच्या दु:स्थितीचा पाढा

अमित शाह पुढे म्हणाले की, बंगालच्या जनतेने ठरवले आहे की, पुढचे सरकार भाजपच बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बंगालच्या जनतेसाठी लाखो रुपये पाठवतात; पण तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार होताना दिसतो. बंगालमध्ये घुसखोरी थांबवली जात नाही. बंगालमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज येतात.

ममता बॅनर्जी यांच्या सरकारने बंगालला संपवले

बंगालमध्ये कम्युनिस्टांनी २७ वर्षे राज्य केले. तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालला संपवण्याचे काम केले. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचार बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून यावर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गप्प बसल्या आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला.

(हेही वाचा – Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेने केलेल्या आरोपांविषयी भारत गंभीर; उचलले ‘हे’ पाऊल)

बंगालची भूमी बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे

सोनार बांगला आणि माँ माटी मानुषचा नारा देत कम्युनिस्टांना हटवून ममता दीदी सत्तेवर आल्या. बंगालमध्ये (Bengal) बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीत ऐकू येत होते, ते आज बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे. संपूर्ण देशातून गरिबी हटवली जात आहे, पण बंगालमध्ये तसे होताना दिसत नाही. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

२०२६ मध्ये बंगालमध्ये भाजपचे सरकार

अमित शाह म्हणाले की, “२०२६ च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार दोन तृतीयांश बहुमताने स्थापन होईल. त्याआधी २०२४ च्या निवडणुका येत आहेत. २०१९ मध्ये तुम्ही भाजपला १८ जागा जिंकून दिल्या होत्या. मी तुम्हाला २०२४ मध्ये इतक्या जागा देण्याची विनंती करायला आलो आहे की, मोदींना शपथ घेतल्यानंतर म्हणावे लागेल की, मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे.” (Citizenship Amendment Act)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.