Power Generation : शेतकऱ्यांसाठी ७००० मेगावॅट वीजनिर्मितीमुळे राज्यात सौर ऊर्जा निर्मिती चळवळीला बळ

राज्यात ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात होईल. ग्रामीण भागात हजारोंनी रोजगार निर्मिती होईल व सौर ऊर्जेशी संबंधित कुशल कर्मचारी वर्ग तयार होईल.

138

सौर ऊर्जेद्वारे ७००० मेगावॅट वीज निर्माण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०’ मुळे शेतकऱ्यांना बळ देण्यासोबतच राज्यामध्ये सौर ऊर्जा निर्मिती Power Generation चळवळीला बळ मिळेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आणि महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत केले.

विश्वास पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच अभियानाचा व त्या अंतर्गत ‘मिशन २०२५’चा प्रारंभ झाला. त्यानुसार सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा Power Generation होईल. त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होईल.

त्यांनी सांगितले की, या अभियानामुळे राज्यात हजारो एकर जमिनीवर सोलर पॅनेल्स उभारून त्याच्या आधारे वीज निर्मिती केली जाईल व ती वीज कृषी पंपांसाठी वापरण्यात येईल. राज्यात ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात होईल. ग्रामीण भागात हजारोंनी रोजगार निर्मिती होईल व सौर ऊर्जेशी संबंधित कुशल कर्मचारी वर्ग तयार होईल. या अभियानासाठी महावितरणच्या वीज उपकेंद्रांची कार्यक्षमताही वाढविण्यात येणार आहे. एकूणच राज्यात या अभियानामुळे सौर ऊर्जा चळवळीला बळ मिळेल.

(हेही वाचा Supreme Court : द्वेषपूर्ण भाषणावर तक्रार आली नाही तरी गुन्हा दाखल करा – सर्वोच्च न्यायालय)

ते म्हणाले की, तांत्रिक व आर्थिक कारणांमुळे कृषी पंपांना दिवसा आणि रात्री असा दोन्ही वेळा वीज पुरवठा केला जातो. रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा आठ तास भरवशाचा वीजपुरवठा व्हावा अशी अनेक वर्षांची मागणी आहे. त्यासोबत क्रॉस सबसिडीचा भार कमी करून उद्योगांना स्पर्धात्मक दरात वीजपुरवठा करावा अशीही मागणी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जात आहे. योजनेत आतापर्यंत १५१३ मेगावॅट वीजखरेदीचे करार झाले आहेत, त्यापैकी ५५३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती Power Generation प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि त्यातून २३० कृषी वाहिन्यांवरील एक लाख शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.