The Kerala story : इस्लामी जिहादला बळी पडलेल्या ३२ हजार महिलांची कथा 

The Kerala story हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

183
दी केरला स्टोरी
दी केरला स्टोरी

काश्मीरमध्ये ९०च्या दशकात हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता, काँग्रेसचा राजवटीत या घटनेवर पांघरून घालण्यात आले, मात्र ३० वर्षांनी गाडलेला इतिहास The Kashmir Files या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आला. ज्यामुळे नव्या पिढीच्या डोळ्यासमोरील झापडे निघून गेली, मात्र याच माध्यमाचा वापर करून ५ एप्रिल रोजी आणखी एक चित्रपट येत आहे. त्याचे नाव ‘दी केरला स्टोरी’ The Kerala story. एकट्या केरळमधील ३२ हजार महिला गायब झाल्या आहेत, ज्या इस्लामी जिहादला बळी पडल्या, त्यांची वास्तवादी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हा चित्रपट आतापासून चर्चेत आला आहे.

विपुल अमृतलाल शाह यांचा हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांची कथा या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. The Kerala story हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून एक काल्पनिक कथानक मांडण्यात आले असले तरी केरळमधील त्या दुर्दैवी घटनेचे दाहक वास्तव आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आपल्याला ३ हिंदू मैत्रिणी आणि त्यांच्याबरोबर असलेली एक मुस्लिम मैत्रीण यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे ज्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आणि धर्मांतर करून लग्न करून दहशतवादी संघटनेशी जोडल्या गेल्या. केरळमधील मुलींच्या या भयावह अपहरणामागील सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे.

(हेही वाचा #TheKashmirFiles चित्रपटानंतर काश्मिरी पंडित जमणार काश्मिरात! काय आहे निमित्त?)

याबरोबरच चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अत्यंत हिंसक आणि हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळत आहेत. “अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव कर्ता धर्ता आहे. किंवा “हिजाब परिधान केलेल्या एकाही मुलीचा बलात्कार झालेला नाही” असे संवाद या ट्रेलरमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. The Kerala story चित्रपटातून अशा धर्मांतर करून आयसीसमध्ये भरती झालेल्या असंख्य मुलींच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. २००९ पासून केरळ आणि बंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे ३२,००० मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सिरिया, अफगाणिस्तान आणि इतर आयएसआयएस अशा भागात आहेत. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर बॉलिवूड निर्माते विपुल अमृतलाल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.