Farmer : शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर आता होणार कारवाई; भरारी पथके सज्ज

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत भरारी पथके नजर ठेवून असणार आहेत. तसेच जिल्हा तक्रार नियंत्रण कक्षाकडे शेतकऱ्यांना Farmer संपर्क करता येणार आहे.

167

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच खताच्या सुयोग्य समतोल वितरणासाठी जिल्ह्यात १४ भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे तसेच जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही जिल्हा कृषी विभागाने Farmer स्पष्ट केले आहे.

खरीप हंगामातील पेरणीच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने तालुकानिहाय पथके नियुक्त केली आहेत. याशिवाय जिल्हास्तरावरही स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. कृषी निविष्ठासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास या पथकांमार्फत संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना दरवर्षी शेतकऱ्यांना बोगस खते व बियाण्यांना तोंड द्यावे लागते. यावर लक्ष ठेवण्याकरिता यंदा भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. खते आणि बियाण्यांवर लक्ष ठेवण्याकरिता तालुका व जिल्हास्तरावर ही पथके कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये देखील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत भरारी पथके नजर ठेवून असणार आहेत. तसेच जिल्हा तक्रार नियंत्रण कक्षाकडे शेतकऱ्यांना Farmer संपर्क करता येणार आहे.

(हेही वाचा Supreme Court : द्वेषपूर्ण भाषणावर तक्रार आली नाही तरी गुन्हा दाखल करा – सर्वोच्च न्यायालय)

शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाया अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावेत, बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणे खरेदीची पावती व बियाण्यांच्या बॅगवरील टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा. ही बॅग फोडताना खालच्या बाजूने फोडावी म्हणजे वरील च्या टैग बॅगेला तसाच राहील. बियाण्यांची फोडलेली पिशवी टॅगसह पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी. म्हणजे बियाणे उगवणीसंदर्भात काही तक्रार आल्यास तक्रार दाखल करता येते. कोणी खत विक्रेता जास्त दराने युरियासारख्या अनुदानित खताची विक्री करत असेल तर याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास लेखी तक्रार करावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.