दादर येथील कबुतरखाना (Kabutarkhana) बंद करावा, या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(हेही वाचा – Terrorist Operation : LoC वर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला; उरीमध्ये एक जवान हुतात्मा)
जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर देण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलनाआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं आहे. याचपार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरातील दुकानेही दुपारपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला होता. (Kabutarkhana)
पोलिसांनी मला बोलूच दिले नाही. डीसीपींंनी आमचे निवेदन स्वीकारायला हवे होते, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

